queen elizabeth news  esakal
ग्लोबल

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या...

अन् तेव्हापासून त्यांना दोन वाढदिवस साजरे करण्याची परवानगी मिळाली

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. राणी एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेकाला 2022 मध्ये 69 वर्ष पूर्ण झाली. महाराणी 2 जून 1953 रोजी ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या होत्या. राज्याभिषेक झाल्यानंतर त्या ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह कॉमनवेल्थ देशांवरही त्यांचं वर्चस्व होतं. यासोबतच खास गोष्ट म्हणजे, तेव्हापासून त्यांना दोन वाढदिवस साजरे करण्याची परवानगी मिळाली.

याचं कारणही ब्रिटनच्या इतिहासात देण्यात आले आहे. त्यांचा खरा वाढदिवस 21 एप्रिल रोजी होता. पण राज्याभिषेकनंतरचा दुसरा वाढदिवस हा अधिकृत वाढदिवस असल्यानं त्या दिवसाला विशेष महत्व होतं. 17 जूनला हा वाढदिवस साजरा केला जात होता. या दिवशी वाढदिवसाला वार्षिक परेडचं आयोजन केलं जात होतं. या दिवशी संपूर्ण ब्रिटनमधून लोक येत असतात. एप्रिल 2022 मध्येच त्यांनी त्यांचा 96 वा वाढदिवस साजरा केला होता.राणीच्या दुसऱ्या वाढदिवसाचा संबंध ब्रिटनच्या हवामानाशी सुद्धा होता. ब्रिटनमध्ये, सिंहासनावर बसणारा राजा किंवा राणी जून महिन्यात आपला वाढदिवस साजरा करतात कारण त्यावेळी ब्रिटनमधील हवामान चांगलं असतं.

आणि अशा प्रकारे अधिकृत वाढदिवसाची सुरुवात झाली..

किंग जॉर्ज यांनी 1748 मध्ये घोषणा केली होती की, राजघराण्यातील कोणत्याही राजपुत्राच्या किंवा सिंहासन धारण करणार्‍या व्यक्तीच्या वाढदिवस मोठा उत्सव म्हणून साजरा करण्यात येईल. यादिवशी शाही परेडचं आयोजन करण्यात येईल.

पण पुढे गादीवर बसलेल्या एडवर्डचा वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात आला. पण त्या महिन्यात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो, थंडीचे वातावरण असते. त्यांचं राज्यरोहण 17 जून रोजी झालं होतं. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस 17 जूनला साजरा करण्याचं ठरवलं. या काळात ब्रिटनमधील हवामान हलकं आणि उष्ण असतं. अशाप्रकारे,17 जून रोजी ही तारीख अधिकृत वाढदिवस साजरा करण्यासाठी ठरवण्यात आली.

भव्य असा अधिकृत वाढदिवस

ब्रिटनच्या राजा किंवा राणीसाठी अधिकृत वाढदिवस खूप खास असतो. कारण तो अतिशय भव्य पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी 14 मोठे अधिकारी, सुमारे 200 घोडे आणि सैनिकांचा सहभाग आहे. याशिवाय 400 संगीतकार एकत्र येतात आणि संगीताच्या माध्यमातून हा दिवस संस्मरणीय बनवतात. शाही परेड राणीच्या निवासस्थानाबाहेर बकिंगहॅम पॅलेस येथे सुरू होते आणि शहरातून परत जाते. त्याला 'ट्रूपिंग द कलर' असे म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT