Afgan girls school
Afgan girls school sakal
ग्लोबल

Afghan girls school : पश्चिमी राष्ट्रांनी तालिबानला फटकारले

सकाळ डिजिटल टीम

तालिबान सरकारने मुलींच्या माध्यमिक शाळा तातडीने सुरु कराव्यात, यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी तालिबान सरकारला फटकारलयं. २३ मार्चला अफगाणिस्तानने मुलींच्या माध्यमिक शाळा सुरु केल्या, मात्र तासाभरातचं शाळाबंदीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे अनेक मुलींना रडू कोसळलं होतं.अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेतल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानची सत्ता आली. त्यानंतर मुलींच्या प्राथमिक शाळा दोन महीन्यानंतर सुरु करण्यात आल्या. सध्या सहावीपर्यंतच मुलींच्या शाळा सुरु आहेत. यासंदर्भात तालिबानचे प्रवक्ते ईनामुल्लाह समंगानी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना इस्लामी कायदे तपासून पुढे निर्णय घेतले जातील असं म्हंटल होतं. (Reopen Afghan girl's school US allies call on Taliban)

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तालिबान सरकारला मान्यता हवी असल्यास मुलींच्या शिक्षणाचा अधिकार हा महत्वाचा मद्दा नमूद केला होता. सर्व मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने मुलींच्या माध्यमिक शाळा पुन्हा सुरु कराव्या असं म्हंटलय. १९९६ -२००१ पर्यंत जेव्हा अफगाणिस्तानात तालिबान सत्ता मिळवली होती. तेव्हा मुलींच्या सर्वप्रकारच्या शिक्षणावर बंदी घातली होती. त्यामुळे यावेळेस देखील मुलींच्या शिक्षणासंदर्भा काय होणार ही चिंता येथील मुलींना आणि शिक्षकांना सतावतेय.

ब्रिटन,कॅनडा, फ्रान्स,इटली आणि नाॅर्वे आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात तालिबान सरकारने तात्काळ मुलींच्या शाळा सुरु करण्याविषयी फटकारलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT