ग्लोबल

लाइव्ह रिपोर्टिंग करतांना श्वानाने केला रिपोर्टरवर हल्ला; त्यानंतर जे घडलं...

शर्वरी जोशी

टीव्ही न्यूज अँकर किंवा रिपोर्टर हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. काही अँकर स्टुडिओतील त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी चर्चेत असतात. तर, काही रिपोर्ट्स त्यांच्या रिपोर्टिंगच्या शैलीमुळे ओळखले जातात. यात अनेकदा लाइव्ह रिपोर्टिंग करतांना रिपोर्ट्ससोबत भन्नाट किस्से घडत असतात. त्यामुळे आतापर्यंत रिपोर्ट्ससोबचत घडलेल्या काही घटना सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. एक महिला रिपोर्टर लाइव्ह रिपोर्टिंग करत असतांना तिच्यावर श्वानाने हल्ला केला. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ MNP 24 या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रिपोर्टर बातमी सांगत असतांना अचानक एक श्वान तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्यावर झेप घेतली. विशेष म्हणजे या श्वानाने केवळ झेपच घेतली नाही, तर तिच्या हातात असलेला माईक घेऊन तो पळून गेला.

कुत्र्याने माइक पळवल्यानंतर ही महिला रिपोर्टर त्याच्या मागे धावत धावत गेली आणि अखेर तिने श्वानाकडून तिचा माईक परत मिळवला.  विशेष म्हणजे हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

१ मिनीट ३६ सेकंदाच्या या व्हिडीओला सध्या सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असून लाइक्स आणि कमेंट्सचा त्यावर पाऊस पडत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT