RIHANNA)
RIHANNA) 
ग्लोबल

#StopAsianHate: ओळख लपवून रिहाना आंदोलनात, पाहा व्हिडिओ

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये सध्या वर्णवादविरोधी आंदोलन सुरु आहे. 'आशियाई लोकांचा द्वेष थांबवा'   #StopAsianHate या स्लोगनखाली हजारो अमेरिकी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकीत वर्णवादाचा इतिहास तसा जुना आहे. अमेरिकेत 16 मार्चला तीन मसाज पार्लवर एका माथेफिरुने हल्ला केला होता. या हल्ल्यात 6 आशियाई वंशांच्या महिलांसह 8 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीने वर्णवादाच्या मुद्द्यावरुन हा हल्ला केला होता. देशात आशियाई-अमेरिकी लोकांवर वाढत असलेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून हजारो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले. प्रसिद्ध गायिका रिहानाही या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रिहानाने स्वत:ची ओळख पटणार नाही अशा प्रकारचा पोशाख केला होता. आंदोलनात ती सक्रीयपणे भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. तिने हातात एक पोस्टर घेतलंय, ज्यावर लिहिलंय, 'आशियाई लोकांचा द्वेष थांबवा'. रिहानाने आपली ओळख गुप्त ठेवली होती. पण, आंदोलनातील एका व्यक्तीला तिनं आपलं ट्विटर हँडल दिलं. त्यावेळी तिची ओळख पटली. यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर रिहानाने एक ट्विट केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली होती आणि भारतात चांगलाच वाद निर्माण झाला होता. भारतातील आंदोलनाशी तिला देणं-घेणं काय असा प्रश्न सरकारकडून विचारण्यात आला. रिहानाच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रेटिजनी ट्विट केलं. काहींनी तिचं समर्थन केलं, तर अनेकांनी तिला विरोध केला. अनेक मोठ्या सेलिब्रेटिजंनी ट्विट करत रिहानाने भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये पडू नये असा सल्ला दिला. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारने याप्रकरणाची दखल घेत, रिहानाला सुनावलं होतं. 

दरम्यान, रिहाना एक प्रसिद्ध गायिका आहेत. तिचे अनेक गाणे प्रसिद्ध असून यूट्यूबवर तिच्या काही गाण्यांना १०० कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. तिचे चाहते जगभरात आहेत. विशेष म्हणजे रिहाना गाण्याबरोबरच समाज कार्यात सक्रीय भाग घेते. तिने जगभरात घडणाऱ्या अन्यायकारण घटनांवर आवाज उठवला आहे. पण, तिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर भाष्ट केल्याने तिला टीका सहन करावी लागली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT