trump to iran 
ग्लोबल

अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला; ट्रम्प यांनी इराणला दिली धमकी

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे की, जर या हल्ल्यात एखाद्या अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला असेल तर लष्करी कारवाई करून उत्तर दिलं जाईल. ट्रम्प यांनी दूतावासावर डागण्यात आलेल्या दोन रॉकेटचे फोटो ट्विट केले असून ही रॉकेट इराणमधून आली आहेत असं म्हटलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून म्हटलं की, रविवारी बगदादमधील आमच्या दूतावासवर अनेक रॉकेटचा मारा झाला. अंदाज लावा ही रॉकेट कुठून आली होती. इराणमधून. आम्हाला असं ऐकायला मिळतंय की इराकमध्ये अमेरिकन लोकांवर आणखी हल्ले होऊ शकतात. एक जरी अमेरिकन यात मारला गेला तरी यासाठी इराणला जबाबदार धरेन. मी हे गांभीर्याने घेत आहे. 

इराकच्या सैन्याने सांगितले की, रविवारी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ग्रीन झोन भागातील अमेरिकेच्या दूतावासर अनेक रॉकेटचा मारा करण्यात आला. या रॉकेट हल्ल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराकच्या सैन्याने म्हटलं की, एका बंदी असलेल्या संघटनेनं ग्रीन झोनवर आठ रॉकेट डागले. या हल्ल्यात एक इराकचा सैनिक जखमी झाला आहे आणि अनेक कारसह इमारतींचे नुकसान झाले. 

अमेरिकेला मात्र वेगळीच चिंता लागून राहिली आहे. इराण समर्थक सैनिक इराकमध्ये 3 जानेवारीला इराणी जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला म्हणून हल्ला करू शकतात. इराणी जनरल सुलेमानीला इराकमध्ये एका हवाई हल्ल्यात अमेरिकेनं ठार केलं होतं. अमेरिकन दूतावासावर झालेले हल्ले हे इराण समर्थक मिलिशियाकडून करण्यात आले होते असंही अमेरिकेच्या सैन्याने म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT