Rahul Gandhi
Rahul Gandhi 
ग्लोबल

Rahul Gandhi : राहुल गांधींनी केली RSS ची मुस्लिम ब्रदरहुड बरोबर तुलना, ब्रिटिश संसदेतील वक्तव्य वादात

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लंडनमधील संसदेच्या सभागृहाच्या आवारात ब्रिटिश खासदारांशी संवाद साधला. हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कॉमेंट रूममध्ये, विरोधी पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतातील राजकारणाविषयी बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहुड बरोबर केली. (RSS fascist organisation built on lines of Muslim brotherhood: Rahul Gandhi in London)

राहुल गांधी यांनी आरएसएसला फॅसिस्ट म्हटले

लंडनस्थित थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये राहुल गांधींनी आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. भारतातील लोकशाही स्पर्धेचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. याला कारण आहे आरएसएस नावाची संघटना. ही एक कट्टरपंथी आणि फॅसिस्ट संघटना आहे. ज्याने भारतातील जवळपास सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. मुस्लीम ब्रदरहुडच्या धर्तीवर आरएसएसची बांधणी झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Pegasus Case : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी ठोकलं मोदींविरोधात भाषण; भाजपनंही दिलं सडेतोड उत्तर

यासोबतच, काँग्रेस १० वर्षे सत्तेत होती. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी आमची सत्ता देशावर होती भाजपला असे वाटते की, ते देशावर अनेक वर्ष राज्य करतील. पण तसे नाही. भाजप कायमची सत्तेवर राहू शकत नाही. असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

Bharat Jodo Yatra : "त्याने मला पाहिलं आणि मी त्याला..."; राहुल गांधींनी सांगितला काश्मीरमधला किस्सा

यापूर्वी राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भाषण करताना मोठा दावा केला होता. माझ्या फोनमध्ये पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आले होते. फक्त माझ्याच नव्हे तर भारतातील इतर अनेक नेत्यांच्या फोनमध्येही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले होते.भारतात लोकशाही धोक्यात आहेत. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. एवढंच नाही तर सरकारने सर्वच संस्थांवर ताबा घेतलाय. माध्यम आणि कोर्टावरही सरकारने कब्जा केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT