Russia ukraine war  Sakal
ग्लोबल

Global : रशियाकडून मैत्री नसलेल्या देशांची यादी जाहीर

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका युरोपसह अन्य देशांनी त्यांच्यावर कडक बंधने घातली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका युरोपसह अन्य देशांनी त्यांच्यावर कडक बंधने घातली आहे. या युद्धात रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा या प्रयत्नात आता रशियानेही एक विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये ज्या देशांशी किंवा संस्थांशी रशियाचे मित्रत्वाचे संबंध नाहीत, त्यांची यादी तयार केली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ज्या देशांनी रशियाविरोधात निर्बंध घातले असे देश यादीत आहेत. मित्र नसलेल्या विदेशी संस्थांबरोबर रशियन नागरिकांना किंवा कंपन्यांना काम करायचे असेल तर विशेष परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे. यासंबंधीचा अध्यक्षीय आदेश सोमवारी प्रसिद्घ करण्यात आला आहे. अशा देशांमधील कर्जपुरवठादारांकडून विदेशी चलनात घेतलेल्या कर्जाची परतफेड रशियाचे चलन रुबल्समध्ये करण्याची मंजुरी या अध्यादेशानुसार देण्यात आली आहे. याचा लाभ रशियाचे सरकार, कंपन्या व नागरिकांना मिळणार आहे.

रशियाशी मित्रत्वाचे संबंध नसलेले देश

अमेरिका, कॅनडा, युरोपिय समुदाय, ब्रिटन, युक्रेन, मोन्टेनेग्रो, मोंटेनेग्रो, स्वित्झर्लंड, अल्बानिया, एंडोरा, आइसलँड, लिकटेन्स्टाइन, मोनॅको, नॉर्वे, सॅन मॅरिनो, उत्तर मॅसेडोनिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मायक्रोनेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि तैवान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT