Russia attacks increased Mykolaiv City in Ukraine The New York Times sakal
ग्लोबल

रशियाच्या हल्ल्यांची धार वाढली; मायकोलाइव्हवर हल्ला; ४० सैनिकांचा मृत्यू

स्वनातीत क्षेपणास्त्रांचा वापर; वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने दिले

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र करायला सुरूवात केली असून प्रमुख शहरांवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट आदळू लागल्याने सगळा देशच बेचिराख होऊ लागला आहे. युक्रेनच्या मायकोलाईव्ह या शहरामध्ये रशियाने केलेल्या रॉकेटच्या हल्ल्यात ४० पेक्षाही अधिक युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने दिले आहे.

रशियाने या संघर्षामध्ये प्रथमच स्वनातीत क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची कबुली दिल्याने जगाच्या चिंता वाढल्या. ‘किंझाल’ असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. दुसरीकडे रशियाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ११२ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनने दिली. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी रशियावरील निर्बंधांच्या अनुषंगाने शुक्रवारी चर्चा केली. रशियाला चीनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा दमच बायडेन यांनी यावेळी जिनपिंग भरला. युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाकडून प्रथमच स्वनातीत क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. पश्चिम इव्हानो- फ्रॅंकीव्हस्क भागातील क्षेपणास्त्रे, दारूगोळ्याचा साठा नष्ट केला. काळ्या समुद्रातील ओडेसा बंदरावरील लष्करी तळालाही लक्ष्य करून स्वनातीत क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ऐक्य दीर्घकाळानंतर पाहिले: पुतीन

मॉस्को, ता. १९ (पीटीआय): खांद्याला खांदा लावून क्रेमलिनचे सैनिक युद्ध लढले आणि त्यांनी एकमेकांना मदत केली, अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी सैनिकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे ऐक्य दीर्घकाळानंतर प्रथमच पाहिले, असेही त्यांनी नमूद केले.

क्रीमियावर ताबा मिळवण्याच्या घटनेस ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मॉस्को येथील लुन्झिकी स्टेडियमध्ये आयोजितो सभेत ते बोलत होते. युक्रेनच्या हल्ल्यानंतर पुतीन प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले स्टेडियममध्ये तब्बल २ लाख नागरिकांनी हजेरी लावली. स्टेडियममधील नागरिकांनी ‘मेड इन द यूएसएसआर’ अशा गीत गायन केले. या गाण्याचे पहिले बोल ‘युक्रेन ॲड क्रीमिया, बेलारुस ॲड मोल्डोवा इट इज ऑल माय कंट्री’ असे होते.

अध्यक्ष पुतीन म्हणाले, की येत्या काही दिवसांत ध्येय प्राप्त केले जातील. आम्हाला काय करायचे आहे, हे चांगलेच ठावूक आहे. त्यासाठी काय किंमत मोजावी लागेल, याची देखील चांगली जाणीव आहे. पुढची योजना देखील सरकारकडे तयार आहे. आज देशातील नागरिक खांद्याला खांदा लावून उभे आहेत. अशा प्रकारचे ऐक्य आपल्याला दीर्घकाळानंतर पाहावयास मिळाले.

पोलाद प्रकल्प नष्ट

रशियाने मारियोपोलमधील युरोपातील सर्वांत मोठा पोलाद प्रकल्प असणाऱ्या अझोवस्तालला ताब्यात घेण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या होता. रशियन लष्कराच्या हल्ल्यामध्ये हा सगळा प्रकल्पच पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाल्याचे युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांचे सल्लागार वदयम देनयेसेन्को यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT