Ukraine President Volodymyr Zelensky esakal
ग्लोबल

रशिया जगण्याचा अधिकार हिरावून घेतोय, जगानं आमचं रक्षण करावं - युक्रेन

युक्रेननं अवघ्या जगाला रशियाविरोधात भूमिका घ्यायला आणि युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

किव्ह : युक्रेननं (Ukraine War) अवघ्या जगाला रशियाविरोधात भूमिका घ्यायला आणि युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. रशिया आमचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतंय, संपूर्ण जगानं आमचं रक्षण करावं, अशी विनंती युक्रेननं केली आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत ट्विट केलं आहे. (Russia is taking away the right to life the world must protect us says Ukraine)

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, जर जग सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीपासून अलिप्त राहिलं तर ते स्वतःलाही गमावून बसतील, ते ही कायमचे. कारण यासाठी बिनशर्त मूल्ये असून ती प्रत्येकासाठी समान आहेत. सर्व प्रथम जीवन आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. युक्रेनमध्ये आम्ही याचसाठी लढत आहोत, आक्रमणकर्ते आम्हाला वंचित ठेवू इच्छितात, ज्याचं संपूर्ण जगानं संरक्षण केलं पाहिजे"

मारियुपोल शहराला रशियन सैन्यानं वेढा दिला आहे, रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. इथल्या नागरिकांना थकवलं गेलंय, छळलं गेलंय. अनेक वर्षांत प्रथमच, नाझींच्या आक्रमणानंतर कदाचित पहिल्यांदाच युक्रेनमध्ये एका मुलाचा डिहाड्रेशनमुळं मृत्यू झाला. युक्रेनमधील हवाई हल्ल्यांमुळे आणि ब्लॉक झालेल्या शहरांमध्ये प्रत्येक मृत्यूचा रशिया कारणीभूत आहे. दोष आक्रमणकर्त्यांचा आहे त्याचबरोबर ही जबाबदारी त्यांचीही आहे जे 13 दिवस कुठलेही आवश्यक निर्णय घेऊ शकले नाहीत, असंही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

आम्हाला सांगण्यात आलं की, आंतरराष्ट्रीय 'रेड क्रॉस' संघटना आम्हाला मानवतावादी मोहिमेसाठी वाहनांवर प्रतीक वापरण्यास मनाई करत आहे. रेडक्रॉस त्यांची मालमत्ता असल्याप्रमाणं आमच्यावर निर्बंध आणत आहे. यातून या वस्तुस्थितीबद्दल बरंच काही कळतंय. याचा काही लोकांवर खूप प्रभाव पडला, अनेक युक्रेनी नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT