Ukraine Russia War
Ukraine Russia War sakal
ग्लोबल

लव्हिववर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; सहा जण ठार; ११ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : पश्‍चिम युक्रेनमधील लव्हिव शहरावर रशियाने सोमवारी क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात सहा जण ठार व ११ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. रशिया-युक्रेनमधील युद्धाला आज ५४ दिवस पूर्ण झाले. रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील शहरांवरील हल्ल्यांची संख्या वाढविली आहे. लव्हिव शहरावर पाच शक्तिशाली व घातक क्षेपणास्त्र डागण्यात आली.खारकिव्ह शहरात गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. मायकेलाइव्हतील ओडेसा बंदराजवळ रॉकेट हल्ले सुरूच आहेत. या युद्धात लव्हिवमध्ये आतापर्यंत सर्वांत कमी हानी झाली असून तुलनेने ते सुरक्षित शहर मानले जात आहे. पण हे शहरही आता रशियाच्या टप्प्यात आले असल्याचे आजच्या हल्ल्यानंतर बोलले जात आहे.

लव्हिवचे महापौर आंद्रे सादोव्ही यांनी शहरावर पाच क्षेपणास्‍त्र डागल्याची माहिती दिली. आपत्कालीन प्रतिसाद पथकाने मदत कार्याला सुरुवात केल्याचेही ते म्हणाले. युक्रेनमधील विविध भागात क्षेपणास्त्र व रॉकेटचे हल्ले होत असून ज्या भागावर रशियाने ताबा मिळविला आहे. तेथे रशियाच्या सैनिकांच्या छळाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. पूर्व डोनबास प्रांत उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा डाव असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला. पूर्व युक्रेनच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे झेलेन्स्की यांनी रविवारी केलेल्या भाषणात म्हटले आहे.

शरण येण्यास नकार

‘शस्त्रे खाली ठेवून शरण आलात तर जीवदान देऊ,’ असे आवाहन रशियाने मारिउपोलमधील युक्रेनी सैनिकांना काल केले होते. हे त्यांनी हे आवाहन धुडकावून लावत शरण येण्यास नकार दिला. ‘रशियाच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मारिउपोलमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ,’ असा विश्‍वास युक्रेनचे पंतप्रधान डेनिस स्मिहल यांनी काल ‘एबीसी’ वृत्तवाहिनीवरील ‘धिस विक’ या कार्यक्रमात व्यक्त केला. शक्य झाल्यास राजनैतिक पातळीवर या युद्धाचा शेवट करण्यास युक्रेन तयार आहे, पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही शरणागती पत्‍करणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.

मारिउपोलमधील अनेक नागरिकांनी मुलांसह अझोव्हत्सव पोलाद प्रकल्पात आश्रय घेतला आहे. रशियाकडून होणारा गोळीबार आणि रशियन सैनिकांच्या तावडीत सापडू नये, यासाठी ते तेथे लपले आहेत, अशी माहिती शहरातील पोलिस प्रमुख मिखाईल व्हर्शिनिन यांनी दिली.

मारिउपोलमधील परिस्थिती गंभीर व हृदयद्रावक आहे. रशियाकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांनी सर्व सीमा पार केल्यास वाटाघाटीतून शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. युक्रेनी फौजा सर्व ताकदीनिशी प्रत्युत्तर देत आहेत, मात्र प्रचंड विनाशामुळे मारिउपोल आता पूर्वीप्रमाणे उभे राहू शकणार नाही.

-दिमित्रो कुलेबा,परराष्ट्र मंत्री, युक्रेन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT