Vladimir Putin sakal
ग्लोबल

रशियाने चोरली कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’

ब्रिटनचा खळबळजनक आरोप; गुप्तहेराने दिले लशीचे तंत्र

सकाळ वृत्तसेवा

लंडन (वृत्तसंस्था) ः ऑक्सफर्डच्या ॲस्ट्रॅझेनेका कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस निर्मितीचा आराखडा (ब्लूप्रिंट) रशियाने चोरला आणि त्यानंतर त्यांनी ‘स्पुटनिक’ लस तयार केली, असा खळबळजनक आरोप ब्रिटनने केला आहे. लस विकसित होत असताना रशियाचा एक गुप्तहेर त्याठिकाणी उपस्थित होता. त्यानेच ऑक्सफर्डच्या लशीचे तंत्रज्ञान रशियाला दिले, असा दावाही केला आहे.

ब्रिटनच्या संरक्षण विभागातील सूत्रांनी हा दावा केला आहे. स्पुटनिक लस तयार करण्यासाठी रशियासाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांनी ‘ॲस्ट्रॅझेनेका’तून कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरली याचे पुरावे, असल्याची माहिती या सूत्रांनी मंत्र्यांना दिली आहे. ‘द सन’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विदेशी गुप्तहेराने ही ‘ब्लूप्रिंट’ आणि कोव्हिशिल्डसंदर्भातील महत्त्वाची माहिती चोरली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीचा डोस काही महिन्यांपूर्वी घेतल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला असताना लशीच्या ‘ब्लूप्रिंट’ चोरीचा आरोप ब्रिटनने केला आहे.

कोरोनाचे संकट संपुष्टात आणण्यासाठी जनतेने लस घेण्याचे आवाहन पुतीन यांनी रशियाच्या जनतेला केले होते. ‘द सन’ने म्हटले आहे की, मॉस्कोत झालेल्या लशीच्या दोन वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष ब्रिटनमधील प्रतिष्ठीत नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाले होते. रशियाची लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे संकेत त्यातून दिले आहेत. ज्या तंत्राचा वापर ऑक्सफर्डच्या लशीत केला आहे, त्याचाच वापर ‘स्पुटनिक’मध्ये केला आहे, असेही म्हटले आहे.

७६ लोकांवर चाचण्या

लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढल्याचे, गंभीर दुष्परिणाम न झाल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. लशीच्या फार कमी चाचण्या झाल्या असून रशियातील लाखो लोकांसाठी त्या पुरेशा नाहीत, असा इशारा देत पाश्‍चिमात्त्य शास्त्रत्रांनी म्हटले आहे की, रशियामधील चाचण्या केवळ ७६ लोकांवर झाल्या आहेत. त्यातील निम्म्यांनाच विषाणूरोधक लस प्रत्यक्षात टोचली आहे, असा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable ODI Squad for Sri Lanka Series: मोहम्मद सिराज बाकावरच, जसप्रीत बुमराहला विश्रांती? श्रीलंकाविरुद्ध कशी असेल भारताची वन डे टीम? लवकरच घोषणा

IND vs NZ 2nd Test Live: फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला किती धावांची गरज? नियम काय सांगतो अन् सध्या सामन्यात आपली काय स्थिती?

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

जन्मत:च राजासारखा थाट घेऊन येतात 'या' राशीचे लोक! सूर्यदेव देतात अफाट तेज अन् आत्मविश्वास

Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT