suptnik vaccine esakal
ग्लोबल

रशियाच्या तिन्ही लशींपासून मिळणार सुरक्षाकवच? मृत्यूची शक्यता जवळपास कमी

रशियाची स्पुतनिक-५ देशात उपलब्ध; कोणतीही एक घ्या

तुषार महाले

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. देशात पहिले कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशी दिल्या जात होत्या; परंतु आता रशियाची स्पुतनिक-५ ही आता देशात उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार या तीन लशींमधील वैशिष्ट्यांमध्ये किरकोळ बदल असू शकतात; परंतु या तिन्ही लशी सर्वांसाठी सुरक्षाकवच ठरणार आहेत. तिन्हींपैकी कोणतीही एक लस घ्यावी. लसीकरणामुळे संसर्गाचा धोका कमी करून मृत्यूची शक्यता जवळपास कमी करते. या तिन्ही लशींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

लसीकरणानंतर काय?

लस घेतल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर नियम पाळणे गरजेचे आहे. गर्दीत जाणे टाळावे, हातांना सॅनिटाइझ करत राहावे. आयसीएमआरनुसार लस घेतल्यानंतर दहा हजार लोकांमध्ये केवळ दोन-चार लोकांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मतानुसार लस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका नसतो.

कोण घेऊ शकतो?

ज्यांना कोणत्यातरी अन्नपदार्थ, औषधांपासून ॲलर्जी आहे किंवा पहिल्या डोसनंतर गंभीर लक्षणे दिसले असतील, अशा नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यावी. गर्भवती, स्तनदा माता, ज्यांनी पहिली ॲन्टिबॉडीज वा प्लाझ्मा थेरपी उपचार घेतले असतील, त्यांनी टाळावे.

व्हॅक्सिनची वैशिष्ट्ये- जी माहीत असायला हवी

तुलनामत्क विश्‍लेषण- कोव्हॅक्सिन-कोव्हिशील्ड-

१. कंपनी- आयसीएमआर भारत बायोटेक- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी एस्ट्राजेनेका आणि भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट

२. लशीचे प्रकार- इनएक्विटेड (मृत कोरोना व्हायरस)- वायरल व्हेक्टर (चिपांजीमध्ये आढळणारा एडेनोवायरस)

३. किती डोस- दोन (दोन्हींमध्ये एकच व्हायरस)- दोन- (दोन्ही डोसमध्ये एकच वायरस)

४. लशीचा दुसरा डोस किती दिवसांनंतर- २८ दिवसांनंतर- ४२-५६ दिवसांनंतर (जादा अंतर असल्यास प्रभावी)

५. किती प्रभावी- ७८ टक्के- ८१ टक्के

६. किती देशांमध्ये- फक्त भारतात- ८० पेक्षा अधिक देशांमध्ये

७. नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी- याबद्दल संशोधन उपलब्ध नाही- सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

स्पुतनिक-५

१. कंपनी- रशियन कंपनी, भारतात डॉ. रेड्डीज लॅबमध्ये उत्पादन

२. लशीचे प्रकार- व्हायरल व्हेक्टर (यामध्ये दोन वेगळे व्हायरस आहेत. यामुळे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत.)

३. किती डोस- दोन (दोन्हींमध्ये वेगवेगळे व्हायरस आहेत. दोन्ही डोस गरजेचे)

४. लशीचा दुसरा डोस किती दिवसांनंतर- २१ दिवसांनंतर

५. किती प्रभावी- ९० टक्के

६. किती देशांमध्ये- ६० पेक्षा अधिक देशांमध्ये

७. नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी- संशोधन सुरू आहे.

* तिन्ही व्हॅक्सिनला दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवले जाते. कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यावी.

काय साइड इफेक्ट?

सर्वांमध्ये हलकीशी वेदना, सुजणे, सर्दी-डोकेदुखी आणि हातपायांमध्ये वेदना होऊ शकतात. जादा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-

ॲन्टिबॉडीज किती दिवस?

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन-तीन आठवड्यांच्या आत ॲन्टिबॉडीज बनतात. परंतु पहिल्या डोसनंतर बऱ्याचअंशी धोका कमी होतो..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT