'रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यास सीरियासह मध्य पूर्वेमध्ये व्यापक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.'
युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (America) युक्रेनला शस्त्रं पुरवून मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेची दोन लष्करी विमानं काल (बुधवार) युक्रेनची राजधानी कीवमध्ये शस्त्रास्त्रांसह दाखल झाली. अमेरिकन विमानांनी युक्रेनला 80 टनांपेक्षा जास्त वजनाची शस्त्रं पुरवली आहेत. युनायटेड स्टेट्सच्या लष्करी विमानांनी आतापर्यंत 10 विमानांनी शस्त्रं पुरवल्याची माहिती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह (Ukrainian Defence Minister Oleksii Reznikov) यांनी दिली.
संरक्षण मंत्र्यांनी ट्विट करून म्हंटलंय की, आज अमेरिकेची दोन विमानं 80 टनांहून अधिक गनपावडर घेऊन बोरिस्पिल विमानतळावर (Boryspil Airport) उतरली. युक्रेन आर्मीच्या (Ukraine Army) सूत्रांचा अहवाला देत आरबीएस-युक्रेननं सांगितलं की, युक्रेनला एकूण 45 विमान शस्त्रं पुरवण्याची अमेरिकेची योजना आहे. गेल्या काही दिवसांत युक्रेनच्या आसपासची परिस्थिती बिघडलीय. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य तैनात झाल्याने अमेरिका आणि युरोपीय संघानं चिंता व्यक्त केलीय.
दरम्यान, अमेरिकन लष्कराचे लेफ्टनंट जनरल एरिक कुरिला यांनी म्हंटलंय की, रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यास सीरियासह मध्य पूर्वेमध्ये व्यापक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. इराण हा अमेरिका आणि या भागातील मित्र राष्ट्रांसाठी मोठा धोका आहे. चीन (China) सेंट्रल कमांड क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे. अमेरिकेला चीन आणि रशियाबरोबरच्या धोरणात्मक स्पर्धेच्या एका नवीन युगाचा सामना करावा लागतोय, जो एका भौगोलिक प्रदेशापुरता मर्यादित नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.