Russia Ukraine War
Russia Ukraine War sakal
ग्लोबल

बाँबहल्ल्यातही वर्णद्वेष कायम; विदेशी नागरिकांना अपमानास्पद वागणूक

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधील लाखो लोकांनी शेजारील देशांमध्ये स्थलांतर केले आहे. मात्र, या बाँब वर्षावामुळेही लोकांच्या मनातील वर्णभेद मिटला नसल्याचे वास्तव ठळकपणे वारंवार पुढे आले आहे.

युक्रेनमधील नागरिकांचे पोलंड, रूमानिया आणि इतर युरोपीय देशांमध्ये स्वागत होत असताना आफ्रिकी, आशियाई आणि लॅटिन अमेरिकी वंशाच्या नागरिकांना मात्र स्वत:चा बचाव स्वत:लाच करावा लागत आहे. त्यामुळे कोणाचीही मदत नसल्याने तेच एकमेकांचे गट बनवून इतरांना मदत करत आहेत. युक्रेनमध्ये १३८ देशांचे नागरिक राहतात. रशियाच्या आक्रमणानंतर आतापर्यंत ८० हजार जणांनी स्थलांतर केले आहे.

या लोकांनी आपले एक जाळे निर्माण केले असून त्याद्वारे ते आपल्या सारख्याच आशियाई, आफ्रिकी आणि लॅटिन अमेरिकी या नागरिकांना युक्रेनबाहेर काढण्यास प्रयत्न सुरु केले. रशियाच्या आक्रमणानंतर शेजारील देशांच्या सीमांवर नागरिकांचे लोंढे धडकत आहेत. युक्रेनचे सैनिक भारतीयांसह आफ्रिकी, आशियाई देशातील नागरिकांना त्यांच्या देशातील नागरिकांपासून वेगळे काढत आहेत. या सर्वांना रुमानियाकडे जाण्यास फर्मावले आहे. पोलंडच्या सीमेवर पोहोचलेल्यांनाही हाच अनुभव आला. तरीही सीमापार जाण्याचा प्रयत्न केल्यास गोळ्या घातल्या जातील, अशी धमकीही दिली जात आहे.

एकी दाखविल्याचा फायदा

युक्रेनमध्ये असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितलेल्या अनुभवानुसार, गेल्या आठवड्यात पोलंडच्या सीमेवर अनेक विदेशी विद्यार्थ्यांना अडविण्यात येत होते. येथे प्रचंड थंडीही पडली आहे. या बिकट परिस्थितीमुळे अडवणूक झालेले अनेक विदेशी नागरिक एकत्र आले आणि त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम होऊन युक्रेनच्या सैनिकांनी त्यांना सीमेपलिकडे जाण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे, सीमापार केलेल्या अनेक जणांकडून युक्रेनमधून नव्याने येणाऱ्या नागरिकांना शक्य ती मदत केली जात आहे.

  • विदेशी नागरिकांना आलेल्या अडचणी

  • मदत छावण्यांमध्ये प्रवेश नाकारला जाणे

  • उपयुक्त माहिती वेळेवर न मिळणे

  • सीमेवर सैनिकांकडून मारहाण होणे

  • वर्णद्वेषी टिपण्णीला सामोरे जावे लागणे

  • दोन्ही बाजूच्या सरकारकडून मदत न मिळणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT