Russia Ukraine War 11 opposition political parties suspected links with Russia suspended in Ukraine  
ग्लोबल

रशियाविरोधात झेलेन्स्कींचा मोठा निर्णय; 11 विरोधी पक्षांवर घातली बंधने

सकाळ डिजिटल टीम

russia ukraine war: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाविरोधात मोठा निर्णय घेत देशातील 11 राजकीय पक्षांवर निर्बंध घातले आहेत. या पक्षांचे रशियासोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या 11 राजकीय पक्षांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत . त्यापैकी सर्वात मोठा म्हणजे विरोधी पक्ष प्लॅटफॉर्म फॉर लाइफ हा असून या पक्षाकडे देशाच्या संसदेत 450 पैकी 44 जागा आहेत.

या राजकीय पक्षाचे नेतृत्व व्हिक्टर मेदवेदचुक (Viktor Medvedchuk) यांच्याकडे असून, त्यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, जे मेदवेदचुक यांच्या मुलीचे ब्लादिमीर पुतीन हे गॉडफादर आहेत. तसेच येव्हेनी मुरायेव यांचा पक्ष Nashi (Ours) party पक्षाचे देखील नाव देखील या यादीत आहे. रशियन आक्रमणापूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की, रशियाला हा मुरायेव हे युक्रेनचा नेता म्हणून हवे आहेत. यानंतर ही कारवाई केली केली आहे.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन फेडरेशनने युक्रेनविरोधात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू केले आहे. दरम्यान रशिया आणि काही राजकीय संघटनांमधील संबंध लक्षात घेता, अनेक राजकीय पक्षांवर मार्शल लॉच्या कालावधीसाठी बंधने घालण्यात आली आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. रशियन सैन्याने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या प्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रशियाने युक्रेनच्या भूमीवर दुसरे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागले.

या वेळी मारियूपोलमधील शाळेला लक्ष्य करण्यात आले. या शाळेत 400 लोकांनी आश्रय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन सैन्याच्या सतच्या हवाई हल्ल्यांनंतर युक्रेन सरकारनेही रशियाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी, झेलेन्स्की यांनी रशियाशी संलग्न असलेल्या 11 राजकीय पक्षांना देशातून निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Dombivli Crime: पगार थकवला, तरूणाला राग अनावर, मालकाकडे गेला अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Vadala Inscription:'शिलालेखात यादवांचा राजा सिंहदेवाचा उल्लेख'; वडाळा येथे सापडलेल्या शिलालेखाच्या वाचनानंतर झाले सिद्ध

Latest Marathi News Live Update: पवार कुटुंबीयांकडे यंदा दिवाळी साजरी होणार नाही

SCROLL FOR NEXT