Russia Ukraine War Updates esakal
ग्लोबल

युक्रेनमधील स्थिती चिंताजनक,भारतीयांना रेल्वेत चढण्याची परवानगी मिळेना

युद्धग्रस्त युक्रेनमधील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

सकाळ डिजिटल टीम

किव्ह : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. येथील खारकिव्ह शहरात मंगळवारी (ता,एक) सकाळी गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Students In Ukraine) मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. या दरम्यान युक्रेनमध्ये भारतीय दूतावासातर्फे सर्व भारतीय नागरिकांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासानंतर वोकझल रेल्वेस्थानकावर अडकलेल्या एक भारतीय विद्यार्थिनीने मंगळवारी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओत ती म्हणते, की भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी नागरिकांना रेल्वेत चढण्याची परवानगी देण्यात येत नाही. विद्यार्थिनी अंश पंडिता व्हिडिओत म्हणते, भारतीय दूतावासाच्या सल्ल्यानंतर भारतीय विद्यार्थी रेल्वेस्थानकावर पोहोचले, जिथे स्थानकावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भारतीय व दुसऱ्या देशांतील नागरिकांना थांबवले.

मी आपल्या दाखवू शकते की येथे किती गर्दी आहे आणि येथे धक्काबुक्की होत आहे. विद्यार्थिनी म्हणते, आम्ही येथे तिरंगा ही लावला आहे. येथे सर्वजण घाबरले आहेत. आम्हाला आशा आहे, की भारतीय दुतावास आम्हाला बाहेर काढेल. आम्हाला लवकरात-लवकर घरी परतायचे आहे. आम्ही भारतीय दुतावासाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला बाहेर काढावे. युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दुतावासाने मंगळवारी विद्यार्थ्यांसहित सर्व भारतीयांना उपलब्ध रेल्वे किंवा इतर साधनांनी आज तात्काळ किव्ह सोडण्याचा सल्ला दिला असताना असे प्रकार घडत आहेत. (Russia Ukraine Conflict)

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर युद्धग्रस्त देशाच्या हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारत येथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकियाशी लागून असलेली तिची (युक्रेनची) सीमा चौकीच्या माध्यमातून बाहेर काढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Jayant Patil : जयंत पाटील महायुतीसोबत जाणार का? सतेज पाटील यांनी एकाच वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम' सांगितला, 'आपण शाहू, फुलेंचे वारस'

Video : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा! PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : मान्सून पुन्हा सक्रिय होणार ! उत्तर, पूर्व आणि मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता

Automatic Weather Centers : हवामानाचा अचूक अंदाज मिळणार की खोळंबा? रत्नागिरीतील 739 ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित, पण 'या' 42 गावांचं काय?

Satara News : सोशल मीडियावरील चर्चांनंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील स्वतः आले समोर! साताऱ्यातील 'त्या' घटनेचे सांगितले सत्य; मद्यधुंद व्यक्तीबाबत नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT