Newlywed Ukrainian Joins Army
Newlywed Ukrainian Joins Army esakal
ग्लोबल

Russia-Ukraine War : लग्न होताच दाम्पत्याला हाती घ्यावी लागली बंदूक

सकाळ डिजिटल टीम

लग्नात एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात; पण..

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. आता रशियन सैन्य युक्रेनच्या अंतर्गत भागात घुसून कहर करत आहेत. दरम्यान, रशियन हल्ल्याचा सामना करण्यासाठी युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांनीही मैदानात उडी घेतल्याचं वृत्त सातत्यानं आहे. वृत्तानुसार, युक्रेनच्या लष्करानं तेथील नागरिकांना रशियाविरुध्द लढ्यासाठी युध्दात उतरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार युक्रेनमधील एका जोडप्याला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बंदूक (AK-47) हाती घ्यावी लागलीय. (Newlywed Ukrainian Joins Army)

मिररच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, ही घटना युक्रेनमधील एका जोडप्याची आहे. कीवमधील 24 वर्षीय स्वियातोस्लेव फुरसिन (Sviatoslav Fursin) आणि 21 वर्षीय यारिना एरिवा (Yaryna Arieva) यांचं लग्न एक वर्ष अगोदरच ठरलं होतं. मात्र, कोरोना महामारीमुळं ते पुढं ढकलण्यात आलं. तद्नंतर देशातील कोविडचे निर्बंध शिथिल होताच, या दाम्पत्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 22 फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं. परंतु, त्यांचं लग्न होताच दुसऱ्याचं दिवसापासून रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी रशियन सैन्याला (Russian Army) प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेन सैन्याच्या (Ukraine Army) खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य नागरिकही युध्दात उतरले. दरम्यान, या नव्या जोडप्यानंही आपल्या हाती शस्त्र घेत रशियन सैन्याचा सामना केलाय.

Newlywed Ukrainian Joins Army

लग्न सोहळ्यात एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात; पण या युक्रेनियन जोडप्यानं रशियन सैनिकांशी लढण्याची शपथ घेतलीय. 22 फेब्रुवारीला या जोडप्याचं लग्न झालं आणि लग्न होताच, त्यांना हाती बंदूक घ्यावी लागलीय. या दाम्पत्यानं त्यांच्या सोशल मीडिया पेजवर काही फोटो शेअर केलेत. ते प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या दाम्पत्यानं लग्नानंतर रशियाविरुद्ध युद्धात उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं. हे दोघंही दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले, असं सांगितलं जातंय. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आता हे दोघंही युद्धात रशियन सैन्याचा सामना करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT