Russia Ukraine War visa and Mastercard suspend their operations in Russia isolate economy
Russia Ukraine War visa and Mastercard suspend their operations in Russia isolate economy  
ग्लोबल

रशियाला आणखी एक आर्थिक झटका; व्हिसा, मास्टरकार्डने बंद केली सेवा

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्याच सुरु असलेल्या युध्दात रशियाला जगभरातून विरोधाला सामोरे जावे लागत आहे, या दरम्यान आता वीजा इंक. (Visa Inc.) आणि मास्टरकार्ड इंक. (Mastercard Inc.) ने रशियामधील सर्व व्यवहार बंद केले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय समुदायापासून आंतरराष्ट्रीय समुदायापासून अर्थव्यवस्था आणखी एकाकी पडण्याचा धोका आहे . शनिवारी काही मिनिटांतच याबाबत दोन्ही बाजूंकडून स्वतंत्र निवेदने जारी करण्यात आली. व्हिसाने रशियाचे युक्रेनवरील आक्रमण, तर मास्टरकार्डने सध्याच्या संघर्षाचे अभूतपूर्व स्वरूप आणि अनिश्चित आर्थिक वातावरणचा उल्लेख त्यांच्या निवेदनात केला आहे.

दोन्ही कंपन्यांना त्यांच्या रिव्हेन्यूच्या सुमारे 4% रशियाशी संबंधित व्यवसायातून मिळतात. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यूएस खासदारांशी व्हिडिओ कॉल दरम्यान रशियामधील सर्व व्यवसाय थांबविण्याचे आवाहन केले, त्यानंतर काही तासांनी हा निर्णय घेण्यात आला. हाऊस फायनान्शियल सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य असलेले कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट ब्रॅड शर्मन यांनी युक्रेनियन नेत्याशी सहमत असल्याचे फोन केल्यानंतर ट्विट केले.

काय परिणाम होईल

व्हिसा आणि मास्टरकार्डने म्हटले आहे की, रशियामध्ये जारी केलेल्या त्यांचे कार्ड वापरून यापुढे देशाबाहेर कोणतेही व्यवहार चालणार नाहीत, तर रशियाबाहेर जारी केलेले कोणतेही कार्ड मर्चंट्स किंवा एटीएमवर देखील काम करणार नाही. व्हिसाने सांगितले की रशियामधील ग्राहक ज्यांच्याकडे त्या देशात जारी केलेले कार्ड आहे ते अजूनही तेथे वस्तू आणि सेवांसाठी पैसे देऊ शकतात, परंतु कंपनी व्यवहार करणार नाही. ते रशियाच्या नॅशनल पेमेंट कार्ड सिस्टम किंवा NSPK अंतर्गत असेल.

रशियन मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, रशियन बँकांनी जारी केलेले व्हिसा आणि मास्टरकार्ड प्रॉडक्ट वर्षाच्या शेवटपर्यंत कार्यरत राहतील. त्याचवेळी, युक्रेनचे अधिकारी डेव्हिड अर्खामिया यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची पुढील फेरी सोमवारी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT