putin sakal
ग्लोबल

तालिबानी आणि विरोधकांमध्ये आम्ही पडणार नाही; रशियाची भूमिका

विनायक होगाडे

मॉस्को : अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय अमेरिकेने जाहिर केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तान या देशावर संपूर्ण ताबा मिळवला आहे. गेल्या १५ ऑगस्ट रोजी देशाची राजधानी काबूल येथे कूच करुन तालिबान्यांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशातून पलायन केले आहे. तालिबानच्या या कृतीनंतर अभूतपूर्व असा गोंधळ पहायला मिळाला आहे आणि अजूनही पहायला मिळतो आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचे पडसाद सध्या जगभरात उमटत असून जगाला तालिबानच्या या कृतीबद्दल आणि एकूणच अफगाणिस्तानबद्दल भुमिका घेणं क्रमाप्राप्त ठरत आहे. याबाबत आता रशियाने देखील आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेल्या पेचात रशिया हस्तक्षेप करणार नाही, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमीत्री पेस्कोव यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, एकत्रित सुरक्षा तह संघटनेच्या (कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ) सदस्य देशांनी हा पेच आणि अफगाणिस्तानातील आणखी एका यादवी युद्धाच्या परिणामांबाबत चर्चा केली आहे. यात कुणीही हस्तक्षेप करणार नाही. या संघटनेत रशियासह बेलारूस, कझाकस्तान, अर्मेनिया, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान या देशांचा समावेश आहे.

तालिबानचा अमेरिकेला इशारा

दरम्यान, तालिबानने अमेरिकेला एक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याची ३१ ऑगस्टची मुदत टळून गेल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा तालिबानने अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आधी जाहीर केलेली ३१ ऑगस्टची तारीख हीच तालिबानने अंतिम असल्याचे गृहीत धरले आहे. रविवारी बायडेन यांनी आपल्या प्रशासनाबरोबरील चर्चेची माहिती दिली. ही मुदत वाढविण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमा काबूल विमानतळावरून पार पडणे सुकर व्हावे हा त्यांचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT