Russian attack Ukrainian railway station  sakal
ग्लोबल

रेल्वेस्थानकावर रशियाचा हल्ला

क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात ३९ युक्रेनी नागरिकांचा मृत्यू; ३०० जखमी

सकाळ वृत्तसेवा

चेर्निहिव्ह : युक्रेनमधील अनेक शहरांना वेढा घालत नागरिकांचा सुटकेचा मार्ग रोखणाऱ्या रशियाच्या सैनिकांनी आज एका रेल्वे स्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ३९ नागरिकांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जखमी झाले.पूर्वेकडील दोन्तेस्क भागातील क्रामातोर्स्क या शहरात ही घटना घडली.

राजधानी किव्ह आणि इतर महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यात रशियाला अपयश आल्यानंतर त्यांनी दोन्तेस्क, लुहान्स्क आणि दोन्बास या युक्रेनच्या पूर्व भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्याची जुळवाजुळव सुरु केली आहे. रशियाकडून मोठे हल्ले होण्याची शक्यता गृहित धरून या पूर्व भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याचे आवाहनही युक्रेन सरकारने केले आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर इतरत्र जाण्यासाठी क्रामातोर्स्क येथील रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने नागरिक जमले असतानाच हल्ला झाला.

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी या हा हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याची छायाचित्रे आपल्या ट्विटरवरून प्रसिद्ध करत रशियाने रानटी हल्ला केल्याची टीका केली. ‘युद्धभूमीवर आमच्यासमोर येण्याचे धाडस नसल्याने त्यांनी विकृत मनोवृत्तीतून जनतेवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. ही एक अनियंत्रित झालेली दुष्टशक्ती आहे. रशियाला धडा शिकविला नाही तर, या दुष्टशक्तीचा प्रभाव वाढतच जाईल,’ असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला.

६५ लाख अंतर्गत विस्थापित

रशियाने युक्रेनमध्ये विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमुळे देशांतर्गत पातळीवर आतापर्यंत ६५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत, तर ४३ लाख लोकांना देश सोडून जावे लागले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेने दिली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात झालेले हे सर्वांत मोठे स्थलांतर आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • जपानकडून रशियाच्या आठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी

  • युक्रेनला समर्थन देण्यासाठी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान किव्हमध्ये

  • रशियाच्या १५ नागरिकांवर लाटव्हियाचे निर्बंध

  • युक्रेन युद्धात मोठे नुकसान झाल्याची रशियाच्या प्रवक्त्यांची कबुली

  • रशियातील जहाजबांधणी व हिरे खाण व्यवसायावर अमेरिकेचे निर्बंध

  • युक्रेनला आणखी ५० कोटी युरोंची मदत करण्याचा ‘ईयू’मध्ये प्रस्ताव

पुतीन कन्यांवर ‘ईयू’चेही निर्बंध

ब्रुसेल्स : रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्या दोन मुलींवर अमेरिकेनंतर आता युरोपीय महासंघानेही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार, मारिया व्होरोंतोसोव्हा आणि कॅटरिना तिखोनोव्हा या पुतीन यांच्या मुलींची युरोपातील संपत्ती गोठविण्यात आली असून त्यांना युरोपात प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली आहे. रशियावरील निर्बंधांचा पाचवा टप्पा जाहीर करताना युरोपीय महासंघाने रशियातून कोळसा आयात करण्यावरही बंदी जाहीर केली आहे.

संयुक्त राष्ट्रांची कृती अर्थपूर्ण : बायडेन

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाची हकालपट्टी करण्याची संयुक्त राष्ट्रांची कृती अर्थपूर्ण आणि परिणामकारक असल्याची प्रतिक्रिया ज्यो बायडेन यांनी दिली आहे. पुतीन यांनी रशियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चेष्टेचा आणि हेटाळणीचा विषय बनविले असल्याचेही यामुळे दिसून आले असल्याचे बायडेन म्हणाले.

तेलाचा राखीव साठा खुला करणार

पॅरिस : युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाची कमतरता निर्माण झाल्याने ही कमतरता भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे सदस्य देश आपल्या राखीव साठ्यातून ६ कोटी बॅरल तेलसाठा खुला करतील, असे या संस्थेने आज जाहीर केले. अमेरिकेसह ३१ देश या संस्थेचे सदस्य आहेत. पुढील सहा महिन्यांत हे देश एकूण १२ कोटी बॅरल तेल खुले करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT