alexei_navalny. 
ग्लोबल

अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती बिघडली; दिवसागणिक 1 किलोने घटतंय वजन

सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियातील राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली आहे. त्यांच्या पायांमधील तसेच हात आणि मनगटातील संवेदना कमी होत आहे. पाठ आणि पायाच्या दुखण्यावर योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा दावा करीत नवाल्नी यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. दिवसागणिक एका किलोने त्यांचे वजन घटते आहे. नवाल्नी यांचे वकील वादीम कोब्झेव यांनी बुधवारी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. नवाल्नी स्वतः चालत आहेत, पण त्यांना त्रास होतो. त्यांचा आजार बळावत चालला असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हद्दपार करण्यात आलेल्या कैद्यांच्या पोक्रोव येथील वसाहतीमध्ये नवाल्नी यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना तेथे अडीच वर्षांसाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पाठीच्या मणक्यात दोन ठिकाणी हार्निया झाला असून पायाचे दुखणे जडले आहे. सतत सर्दी आणि ताप असल्याचेही नवाल्नी यांनी कोब्झेव यांना सांगितले. वसाहतीत एकही डॉक्टर नाही. तेथील वैद्यकीय केंद्र एकच निमवैद्यकीय कर्मचारी चालवतो आहे, असेही कोब्झेव म्हणाले. नवाल्नी यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा गेल्या आठवड्यात रशियन कारागृह अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता.

नवाल्नींच्या बाजूला चिकन भाजतात
नवाल्नी ४४ वर्षांचे असून गेल्या आठवड्यात त्यांनी उपोषण सुरु केले. त्यात अडथळा यावा म्हणून तुरुंगातील अधिकारी आपल्याजवळ चिकन भाजतात आणि खिशांमध्ये मिठाई ठेवतात असा आरोप नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केला आहे.

अमेरिकेची प्रतिक्रिया
नवाल्नी यांची प्रकृती ढासळत असल्याचे वृत्त त्रासदायक आहे, अशी प्रतिक्रिया व्हाइट हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आली. प्रसिद्धी सचिव जेन साकी यांनी सांगितले की, नवाल्नी यांना कैदेत ठेवण्यामागे राजकीय उद्देश असून हा घोर अन्याय आहे. त्यामुळे त्यांची तातडीने सुटका केली जावी, अशी बायडेन प्रशासनाची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT