Vladimir Putin esakal
ग्लोबल

रशियाचे राष्ट्रपती पुतीन विलगीकरणात; डझनभर निकटवर्तीयांना 'कोरोना'

बाळकृष्ण मधाळे

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे विलगीकरणात गेले आहेत. पुतीन यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची (Coronavirus) बाधा झाली आहे. त्यानंतर पुतीन यांनी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलाय. पुतीन यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक पुतीन यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवत असल्याचेही समजते.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे विलगीकरणात गेले आहेत.

तर, पुतीन यांना भेटणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करणाऱ्यांनाच पुतीन यांची भेट घेता येत होती. एवढी काळजी घेतल्यानंतरही पुतीन यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झालीय. त्यांच्या संपर्कातील डझनभर अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी झाली असून त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेय.

मॉस्कोच्या एका बैठकीत पुतीन म्हणाले, की माझ्या संपर्कातील अनेकांना कोरोना झाला असून त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलीय. यात डझनभर लोकांचा समावेश आहे. राष्ट्रपती कार्यालय 'क्रेमलिन'ने पुतीन यांना मंगळवारी सेल्फ-आयसोलेशनमध्ये जाण्याबाबत माहिती दिली होती. 'क्रेमलिन'चे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह म्हणाले, पुतीन यांनी कोविडची चाचणी जवळच्या मित्राला कोरोनाची लागण झाल्यानंतर केली होती. परंतु, तेव्हा संसर्गाची कोणतीही पुष्टी होऊ शकली नव्हती.

पुतीन यांनी कोविडचे घेतले दोन्ही डोस

पुतीन यांनी कोविड लस स्पुतनिक- V चे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांनी एप्रिलमध्ये दुसरा डोस घेतला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले, की राष्ट्रपती पूर्णपणे निरोगी आहेत. परंतु, संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. पुतीन किती काळ आयसोलेशनमध्ये राहणार याची प्रवक्त्यांना माहिती नाही. मात्र, ते आपले काम सुरू ठेवतील, असे प्रवक्त्याने सांगितलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT