Same-sex Marriage Joe Biden esakal
ग्लोबल

US Same-Sex Marriage Bill : अमेरिकेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर; जो बायडेन यांनी केलं विधेयकाच्या बाजूनं मतदान

2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरात यावर बंदी घातली होती.

सकाळ डिजिटल टीम

2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरात यावर बंदी घातली होती.

अमेरिकन सिनेटनं (US Senate) मंगळवारी समलिंगी विवाहाला (Same-sex Marriage) संरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केलं.

बायडेन म्हणाले, 'प्रेम हे प्रेम असतं आणि अमेरिकन लोकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार असावा. यूएस सिनेटनं मंजूर केलेलं विधेयक समलैंगिक विवाहास फेडरल मान्यता संरक्षित करेल.' 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरात त्यावर बंदी घातली होती. विधेयकाच्या समर्थनार्थ 61 तर विरोधात 36 मतं पडली. हे विधेयक सुनिश्चित करेल की, समलैंगिक आणि आंतरजातीय विवाह यूएस फेडरल कायद्यात समाविष्ट आहे.

सिनेटचे नेते चक शूमर म्हणाले, हे समानतेच्या दिशेनं एक पाऊल आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात पक्षाचं बहुमत असतानाही डेमोक्रॅट वेगानं प्रगती करत आहे. हा कायदा आता अंतिम मतदानासाठी सभागृहाकडं जाईल. यूएस सिनेटच्या मतानं हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडं परत पाठवलं जाईल. सभागृह त्याला मंजुरी देईल आणि त्यानंतर हे विधेयक स्वाक्षरीसाठी जो बायडेन यांच्याकडं पाठवलं जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी द्विपक्षीय मताचं कौतुक केलं आणि म्हणाले, सभागृहानं मंजूर केल्यास ते त्वरित आणि अभिमानानं या विधेयकावर स्वाक्षरी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT