PM Modi in US Congress Sakal
ग्लोबल

PM Modi in US Congress: PM मोदींनी US House मध्ये समोसा कॉकसचा उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट का झाला?

सभागृहात समोसा कॉकसचा उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi in US Congress: समोसा कॉकस असा शब्दप्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत केला , ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी पीएम मोदींनी दोन्ही देशांमधील आधीच घट्ट होत चाललेल्या संबंधांवरही चर्चा केली.

त्यांनी सभागृहात समोसा कॉकसचा उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते असेही म्हणाले की ही अशी कॉकस आहे जी आता या सभागृहाचा भाग बनली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा विशेष उल्लेख केला आणि ते म्हणाले की "मला सांगण्यात आले आहे की समोसा कॉकस आता या हाऊसचा मूळ भाग बनला आहे. मला आशा आहे की ते वाढेल आणि येथे भारतीय पाककृतीची संपूर्ण विविधता आणेल."

समोसा कॉकस म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेला समोसा कॉकस हा खरंतर अमेरिकेत राहणार्‍या पण त्यांची मुळे भारतात असलेल्या लोकांच्या गटाशी संबंधित आहे आणि समोसा भारतीय पदार्थ म्हणून त्यांच्यामध्ये खूप लोकप्रिय आहे. हा प्रकार तिथे खूप चवदार मानला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, "तुम्ही जगभरातील लोकांना सामावून घेतल आहे. अमेरिकेत तुम्ही त्यांना समान वाटा दिला आहे, ही मोठी गोष्ट आहे.

इथे लाखो लोक आहेत ज्यांची मुळे भारतीय आहेत. त्यातील काही या हाऊस मध्ये अभिमानाने बसले आहेत आणि पूर्वीही बसले होते."

समोसा कॉकस हा शब्द कधी सुरू झाला?

प्रत्येक शब्दाचा स्वतःचा इतिहास असतो. समोसा कॉकस या शब्दाचा इतिहास देखील 2018 सालचा असल्याचे मानले जाते.

अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी हा शब्द पहिल्यांदाच सार्वजनिकपणे वापरला असे म्हटले जाते.

हा शब्द हळूहळू रूढ झाला असे म्हणतात. अमेरिकेत भारतीय वंशाचा लोकांना इथे समोसा म्हटलं जातं. समोसा कॉकस हा शब्द भारतीयांच्या एकतेचे प्रतीक बनला. भारतीय खाद्यपदार्थांच्या दुकानालाही समोसेपिडिया म्हटले जाऊ लागले.

अमेरिकन संसदेत किती भारतीय आहेत?

अमेरिकन राजकारणात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे. सध्या भारतीय वंशाचे पाच अमेरिकन प्रतिनिधी आहेत. सहावे व्यक्तिमत्व उपाध्यक्ष कमला हॅरिस या सिनेटच्या नेत्या आहेत. विशेष म्हणजे ते सर्व डेमोक्रॅट आहेत.

शामल ठाणेदार, डॉ. अमी बेरा, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि कृष्णमूर्ती हे भारतीय वंशाचे पाच प्रतिनिधी आहेत. या सगळ्यांना सध्याच्या बायडन सरकारचे मजबूत आधारस्तंभ म्हटले जाते. आणि अमेरिकेत सरकारी धोरणे बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.

साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोसा कॉकस या शब्दाचा फोकस याच बाजूला होता. केवळ सभागृहातच नाही तर अमेरिकेत सर्वच क्षेत्रात भारतीयांची वाढती उंची आणि धैर्य सामोसा कॉकसकडे निर्देश करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT