santa
santa 
ग्लोबल

VIDEO - ख्रिसमस गिफ्ट घेऊन जाणारा सांता अडकला वीजेच्या खांबावर

सकाळ डिजिटल टीम

कॅलिफोर्निया - जगात सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. कोरोनाचे संकट असले तरीही ख्रिसमसच्या तयारीला लोक लागले आहेत. सोशल मीडियावर या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातच एक व्हिडिओ जगभर चर्चेत आला आहे. कॅलिफोर्नियातील एक व्यक्ती सांताक्लॉजचे कपडे घालून त्यांच्या मोटराइज्ड खासगी विमानातून निघाला होता. त्यावेळी त्याच्या विमानाला अपघात झाला आणि वीजेच्या खांबावर असलेल्या तारांमध्ये अडकल्याचं वृत्त पीपल्स मॅगेझिनने दिलं आहे. 

सॅक्रॅमेन्टोतील भागात लहान मुलांना चॉकलेट्स वाटण्यासाठी संबंधित व्यक्ती निघाली होती. रविवारी सकाळी त्याचं विमान कोसळलं आणि नेमकं वीजेच्या खांबावर तो अडकून बसला. या घटनेचे फोटो आणि व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सांता क्लॉजच्या वेषात असलेली व्यक्ती वीजेच्या तारांत अडकल्याचं दिसत आहे. 

कॅलिफोर्नियातील हायवे पेट्रोलच्या नॉर्थ सॅक्रॅमेन्टो विभागानं या व्यक्तीचा जीव वाचवला. यानंतर हायवे पेट्रोलनं फेसबुक पोस्टमधून याची माहिती दिली आहे.  त्यांनी म्हटलं आहे की, सुट्टीच्या आधी काही मिनिटं आनंद साजरा करण्याचा प्रयत्न सांता करत होता. मात्र त्याचवेळी तारेत अडकला.  त्यानंतर अडकलेल्या सांताला काढण्यासाठी अग्निशमन विभागानं मदत केली. सुदैवाने त्या व्यक्तीला दुर्घटनेत काहीच दुखापत झाली नाही. 

अग्निशमन विभागाने बचावकार्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अग्निशमन विभागाने म्हटलं की, व्यक्ती हायपर लाइट विमान उडवत होता. ते ग्लायडर नव्हतं. कॅलिफोर्नियातील काही स्थानिक चॅनेल्सनी पॅराशूट म्हटलं होतं. तर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने हे विमान एक पॉवर्ड पॅराशूट असल्याचं सांगितलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT