Saudi Arabia
Saudi Arabia Google file photo
ग्लोबल

सौदीचा मोठा निर्णय; मशिदीवरील लाउडस्पीकरला आवाजाची मर्यादा

वृत्तसंस्था

रियाध : सौदी अरेबियामध्ये सातत्याने उदारमतवादी धोरणे राबवणाऱ्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सौदी अरेबियातील मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर यापुढे त्यांच्या क्षमतेच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आवाज करू शकणार नाहीत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लाउडस्पीकर केवळ अझान आणि इकामतसाठी वापरले जाऊ शकतात. सौदीचे इस्लामिक कामकाज मंत्री डॉ. अब्दुललतीफ अल-शेख यांनी मंत्रालयाच्या सर्व विभागांना एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ''लाऊडस्पीकरच्या आवाजाबद्दलच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.'' (Saudi Arabia restricts volume of mosque loudspeakers after complaints about noise)

कट्टर वहाबी गट होऊ शकतात नाराज

सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यापासून आता मशिदीवरील लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील कट्टरपंथीयांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. यापूर्वी २००९ मध्येही असाच एक निर्णय घेण्यात आला होता, परंतु जोरदार विरोध झाल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, जर मशिदींनी लाऊडस्पीकरच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढवला, तर मशीद प्रशासनावरही दंड आकारला जाऊ शकतो. हा निर्णय लोकांच्या हितासाठी घेण्यात आला असल्याचे इस्लामिक कामकाज मंत्र्यांनी सांगितले आहे.

ज्येष्ठ आणि लहान मुलांना व्हायचा त्रास

इस्लामिक कामकाज मंत्री अब्दुललतीफ अल-शेख म्हणाले की, नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत की, लाउडस्पीकरमुळे मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना समस्या उद्भवू शकतात. ज्यांना खुदाची उपासना करायची आहे, त्यांना अजानची वाट पाहण्याची गरज नाही. गेल्या काही दिवसात सौदीमध्ये असे अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यांनी अनेक दशकांपूर्वीची परंपरा बदलली आहे. त्यामध्ये स्त्रियांना वाहन चालविण्याची परवानगी आणि सिनेमा हॉल सुरू करण्यासारख्या निर्णयाचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जगात देशाची प्रतिमा सुधारणे, हे सौदीमधील विविध बदलांमागचे एक कारण आहे. याशिवाय परदेशी गुंतवणुकीला निमंत्रण देण्यासाठी उदारमतवादी धोरणांचीही आवश्यकता आहे. विशेषत: योजना २०३० अंतर्गत प्रिन्स मोहम्मद-बिन-सलमान यांनी उदारमतवादी धोरणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या व्यवसायात घसरण होत असतानाही सौदीची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT