Saudi Arabia esakal
ग्लोबल

Saudi Arabia: थेट खून करण्याचाही आदेश...न्यूयॉर्कपेक्षा ३३ पट मोठं शहर उभारत आहे सौदी

सौदी अरेबिया आधीच इतर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे जेणेकरून ते तेल व्यतिरिक्त पैसे कमवू शकतील. या अंतर्गत सौदी अरेबिया ताबुक शहराजवळ एक वेगळे शहर बांधत आहे.

Sandip Kapde

Saudi Arabia:

सौदी अरबिया मोठी गुंतवणूक करत आहे. पाकिस्तानमध्ये देखील सौदीचे ५० अधिकारी अभ्यास करण्यासाठी गेले आहे. तेलाच्या व्यतिरीक्त आणखी कसे पैसे कमवता येतील याकडे सौदीचा कल आहे. दरम्यान सौदी एक नवीन शहर उभारत आहे. ताबुक शहराजवळ उभारण्यात येणारे हे शहर न्यूयॉर्कपेक्षा ३३ पट मोठं असेल.

जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे पर्याय शोधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे तेलाच्या आधारे श्रीमंत झालेले सौदी अरेबियासारखे देश अडचणीत आले आहेत. जगभरात पेट्रोस आणि डिझेलला पर्याय शोधले जात आहेत. अनेक इलेक्ट्रिक वाहन बाजारात आले असून याचा परिणाम सौदीच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. सौदी अरेबियाने 'व्हिजन 2030' लाँच केले आहे. या अंतर्गत सौदी अरेबिया अनेक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे.

सौदी निर्मान करत असलेल्या शहराचं नाव  निओम ठेवण्यात आलं आहे.  हे शहर तयार करण्याचे काम सुरू झाले असून भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. एवढेच नाही तर भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सौदी प्रशासनाने घेतला आहे. भूसंपादनाला कोणी विरोध केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. आंदोलन हिंसक झाले तर खून करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. हिंदुस्तान लाईव्हने बीबीसीच्या हवाल्याने ही माहिती दिली.

जगातील अनेक कंपन्यांचा ही सिटी उभारण्यात गुंतलेल्या आहेत. कर्नल राबिल एलेनजी म्हणाले की, एका जमातीचे लोक या भागात विरोध करत आहेत. आता त्यांना जमीन रिकामी करण्यासाठी कठोरता दाखवली जाणार आहे. नुकतेच यातील एकालाही गोळी लागली, त्यात त्याचा मृत्यू झाला. सौदी प्रशासनाने या अहवालावर सध्या काहीही सांगितलेले नाही.

या शहराचा सुमारे अडीच किलोमीटरचा भाग २०३० पर्यंत पूर्णपणे तयार होईल. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे ६००० लोक विस्थापित झाले आहेत. अनेक गावेही पूर्णपणे हटवण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत वस्ती असलेली गावे कशी सपाट झाली आहेत. रुग्णालये, शाळा आणि कम्युनिटी हॉलही उद्ध्वस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT