Mick Schumacher accident_Saudi Arabian GP 
ग्लोबल

मायकल शुमाकरच्या मुलाचा भीषण अपघात; कारच्या उडाल्या ठिकऱ्या

माईकच्या कारचा स्पीड २७४ किमी प्रति तास इतका प्रचंड होता.

सकाळ डिजिटल टीम

फॉर्म्युला वन चॅम्पिअन मायकल शुमारकरचा मुलगा माईक शुमाकर याचा स्पर्धेदरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्याची कार काँक्रिटच्या बॅऱिअरला धडकल्यानं कारच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. पण यामध्ये तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. (Formula One champion Michael Schumacher son tragic accident Car wreckage)

जेद्दाहमध्ये सुरु असलेल्या सौदी ग्रँड प्रिक्स क्वालिफाईंग राऊंडच्या दुसऱ्या सेशनमध्ये शनिवारी हास एफ १ टीमचा ड्रायव्हर असलेला माईक शुमाकरची अतिवेगात असलेली कार ट्रॅक सोडून काँक्रीटच्या बॅरिअरवर जाऊन आदळली. यामध्ये त्याच्या कारचे अक्षरशः तुकडे झाले, इतका हा भयंकर अपघात होता. या अपघातातून माईक मात्र बचावला आहे. फॉर्म्युला वन स्पर्धेच्या टीमनं ही माहिती दिली आहे. माईकचे वडील माईकल शुमाकर फॉर्म्युला वन स्पर्धेचा सात वेळा चॅम्पिअन राहिले आहेत.

अपघातानंतर माईकला अॅम्ब्युलन्समधून सर्किट मेडिकल सेंटरला नेण्यात आलं. स्काय स्पोर्ट्स टीव्हीनं सांगितलं की, माईकच्या कारचा स्पीड हा २७४ किमी प्रतितास इतका प्रचंड होता. दहाव्या वळणावर वळण घेत असताना त्याची कारण ट्रॅकच्या बाजूला असलेल्या काँक्रीटच्या बॅरिअरवर जाऊन आदळली. यानंतर कारचे तुकडे होऊन त्याचे अवशेष ट्रॅकवर पसरले होते. हे अवशेष दूर करण्यासाठी बराच काळ ही फेरी थांबवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT