saudi 
ग्लोबल

सौदी महिलांना लष्कराची दारं खुली; तिन्ही सैन्य दलातील प्रवेशाला मंजुरी

सकाळन्यूजनेटवर्क

रियाध- मुस्लीम देश असणारा सौदी अरेबिया मोठे सामाजिक बदल करताना दिसत आहे. महिलांना मर्यादीत हक्क देणारा सौदी आता त्यांच्यासाठी अनेक दारे उघडत आहे. सिनेमा, ख्रिस्मस सेलिब्रेशन, महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिल्यानंतर सौदीने आता महिलांच्या लष्करातील सहभागाचा मार्ग खुला केला आहे. एका मुस्लीम राष्ट्राने घेतलेला हा निर्णय अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

सौदी अरेबियातील महिला रॉयल आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस जॉईन करु शकणार आहेत. गेल्या अनेक शतकांपासून जुन्या धार्मिक परंपरामध्ये अडकलेल्या सौदीने सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला आता सारख्याच पदासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. महिलांना आता सैनिक, लान्स कॉर्पोरल आणि सार्जेंट पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. 

अर्ज करणारी महिला 21 ते 40 वयोगटातील असावी. महिलेची उंची 155 सेंटीमीटर असणे अनिवार्य आहे. तसेच महिलेने हायस्कूल शिक्षण घेतलेले असावे आणि तिने एका बिगर-सौदी व्यक्तीशी लग्न केलेले असू नये. सौदी अरेबियाने उचलले हे पाऊल क्राऊन प्रिन्स मोहमद सलमान यांनी दूरदृष्टीतून घेतले आहे. 2030 पर्यंत महिलांना अनेक क्षेत्रात पाहण्याचं त्याचं व्हिजन आहे. येत्या काळात महिलांवरील निर्बंध आणि त्यांच्या सहभागाला मर्यादीत करणारे कायदे आणखी शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. 

मोहमद सलमान यांनी आधुनिक जगासोबत स्पर्धा करण्यासाठी उचलले हे पाऊल देशातील पुराणमतवादी लोकांना सहजासहजी मान्य होण्यासारखे नाही. असे असले तरी राज्यकर्त्यांनी धरलेली प्रगतीची कास कौतुकास्पद आहे. दुसरीकडे इराणसारखे देश वेगळ्या मार्गाने जात असल्याचं दिसत आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला खामेनी यांनी फतवा काढला असून कार्टूनमध्ये दाखवल्या जाणाऱ्या महिलांनाही हिजाब दाखवणे बंधनकारण केले आहे. महिलांच्या पेहरावावर अनेक बंधने आणण्यात आली आहेत. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT