Scale-up battle preparedness, Xi Jinping tells Chinese military 
ग्लोबल

युद्धासाठी तयार राहा; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चीनची कोंडी झाली असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचे व युद्धसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. देशाची स्थिरता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करा व युद्धसाठी तयार राहा, असे निर्देश जिनपिंग यांनी दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना संकटासाठी जगातील बहुतांश देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. चहूबाजूंनी चीनवर दबाव वाढत चालला आहे. चीनचा सध्या अमेरिका आणि भारताबरोबर वाद सुरु आहे. दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. त्याशिवाय चीन हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेने यावर खूप कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असा इशाराही चीनला दिला आहे.
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
अशा परिस्थितीत या सर्व पार्श्वभूमीवर चीन कोणासमोर झुकणार नाही किंवा कोणालाही घाबरणार नाही हे दाखवून देण्यासाठी जिनपिंग यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. कोरोना व्हायरच्या संकटामुळे चीन एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात वुहान शहरातून झाली आणि चीनने हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सातत्याने त्यांच्यावर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

ENG vs PAK: पासपोर्ट नव्हता, फोन बंद, कोचने बाईकवरून शोधलं... जो रुटला बाद करणारा पाकिस्तानचा रझाउल्लाह कसा पोहचला इंग्लंडमध्ये?

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Marathi News Live Updates : महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT