women burkha Esakal
ग्लोबल

शिक्षकाचा हुकुमशाही फरमान! हिजाब नीट न घालणाऱ्या १४ विद्यार्थिंनींचे केले मुंडन

विद्यार्थिंनींनी हिजाब व्यवस्थित न घातल्याने त्यांचे टक्कल करण्याचे आदेश एका शिक्षकाकडून देण्यात आले होते, त्यानंतर मानवाधिकार संस्थने आवाज उठवल्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबीत करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indonesia Hijab Case: इंडोनेशियातील एका शाळेत 14 विद्यार्थिनींनी हिजाब नीट घातला नसल्यामुळे त्यांचे टक्कल करण्यात आले. चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्याबद्दल शिक्षा म्हणून शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांचे टक्कल करण्याचे आदेश दिले.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, या विद्यार्थिनींनी डोक्याला स्कार्फ नीट बांधला नव्हता. इंडोनेशिया हा फार कठोर नियम असलेला देश म्हणून ओळखला जात नाही, परंतु तेथील काही भागात महिलांसाठी कठोर ड्रेस कोड लागू आहेत. 2021 मध्ये, देशातील शाळांमध्ये अनिवार्य ड्रेस कोडवर बंदी घालण्यात आली.

यानंतरही देशात मुस्लिम आणि बिगर मुस्लिम मुलींचा हिजाब परिधान केल्याबद्दल छळ होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पूर्व जावा येथील सरकारी कनिष्ठ हायस्कूलमध्ये ही घटना घडली. 23 ऑगस्ट रोजी एका वर्गशिक्षकाने 14 मुस्लिम विद्यार्थिनींना टक्कल पाडण्याचा निर्णय दिला. (Latest Marathi News)

शिक्षकाची ओळख अद्याप उघड झालेली नाही. दुसरीकडे शाळेचे मुख्याध्यापक हार्टो यांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून शाळेने विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

ते म्हणाले की, विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालण्याचा कोणताही औपचारिक आदेश जाहीर करण्यात आलेला नाही. त्यांना त्यांचे डोके झाकण्यासाठी आणि स्कार्फ व्यवस्थित बांधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यानंतरही शिक्षा झालेल्या विद्यार्थिनींनी नीट हिजाब घातला नसल्याने त्यांचा पूर्ण चेहरा दिसत होता. (Latest Marathi News)

ज्या मुलींसोबत ही घटना घडली आहे, त्यांना मानसिक आधार दिला जाईल, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मानवाधिकार संघटनांनी शिक्षकाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT