8th Continent Esakal
ग्लोबल

8th Continent: जगातील आठवा खंड सापडला; समुद्रातील महाद्वीपाला संशोधकांकडून ‘झिलँडिया’ नाव

जग सात खंडांनी निर्माण झाले आहे, हे ज्ञात आहे. पण आता आठवा खंडही अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे

सकाळ वृत्तसेवा

जग सात खंडांनी निर्माण झाले आहे, हे ज्ञात आहे. पण आता आठवा खंडही अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे. भूवैज्ञानिकांनी ३७५ वर्षांपासून लपलेला हा खंड शोधला आहे. या खंडाला ‘झिलँडिया’ असे नाव देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘झिलँडिया’ अर्थात ‘ते रिउ-ए-माउई’चा सुधारित नकाशा तयार करण्यात आला आहे, असे ‘Phys.org’ने म्हटले आहे. समुद्रात दोन किलोमीटर खोलीवर हा खंड आढळून आला आहे. संशोधकांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांच्या नमुन्यांच्या माहितीचा वापर करून या खंडाचा शोध घेतला आहे. हा खंड पाण्यात असल्याने तेथे पोहोचणे शक्य नाही.

‘झिलँडिया’ची वैशिष्ट्ये

विस्तार ४९ लाख चौरस किलोमीटर. मादागास्करच्या आकारापेक्षा सुमारे सहापट मोठे क्षेत्र

सर्वांत लहान, निमुळते आणि नव्या खंडाचा विक्रम नावावर

नव्या खंडाचा ९४ टक्के भाग पाण्याखाली

न्यूझीलंडप्रमाणे मूठभर बेटाचा भाग

सुमारे ५५ कोटी वर्षांपूर्वी झिलँडिया हा प्राचीन महाखंड गोंडवानाचा भाग होता

भूगर्भीय हालचालींमुळे झिलँडियाचा भाग वेगळा होऊन समुद्रात विलीन झाला

प्रयत्न फळाला

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार जगात प्रत्यक्षात आठ खंड अस्तित्वात आहेत. झिलँडिया खंडाचा अभ्यास करणे तसे कठीणच समजले जाते. समुद्राच्या तळातून आणलेल्या खडक आणि गाळाच्या नमुन्यांचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत. खडक व गाळाचे काही नमुने खोदकामाच्या ठिकाणावरून तर काही त्या भागातील बेटांच्या किनाऱ्यावरून आणण्यात आले आहेत. न्यूझीलंडमधील पश्‍चिम किनाऱ्यावरील कॅम्पबेल पठाराजवळ ‘सबडक्शन’ केंद्र असल्याची शक्यता पश्चिम अंटार्क्टिकामधील भूगर्भीय नमुन्यांच्या अभ्यासातून व्यक्त झाली. (Marathi Tajya Batmya)

जे ‘कॅम्पबेल फॉल्ट’मधील ‘स्ट्राइक-स्लिप’च्या सभोवतालच्या सिद्धांतांविरुद्ध युक्तिवाद करतात, त्या शास्त्रज्ञांना त्या भागात चुंबकीय अनियमितता आढळलेली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT