Shashi Tharoor Share Photo in Context of Russia Ukraine War gone Viral
Shashi Tharoor Share Photo in Context of Russia Ukraine War gone Viral  esakal
ग्लोबल

शशी थरूरांनी युद्धभूमीतील शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी मोहिम सूरू केल्यानंतर दोन्ही देशातील युद्धाला तोंड फुटले. 24 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच रशिया - युक्रेन युद्धासंदर्भातील (Russia Ukraine War) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आहेत. बॉम्बस्फोट, गोळीबार, आकाशात घिरट्या घालणारी लढाऊ विमाने, जीव मुठीत घेऊन मिळल त्या वाटेने पळणारी माणसे, ट्रफिक जाम याबाबतच्या व्हिडिओंनी सोशल मीडिया भरून गेला होता. या सर्व अराजकतेच्या गर्तेत काही असे फोटो असेही शेअर झाले ज्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. असाच एक फोटो काँग्रेस नेते शशी थरूरांनी (Shashi Tharoor ) देखील शेअर केला.

शशी थरूरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर (Shashi Tharoor Twitter) केला. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे. या फोटोच्या माध्यमातून युक्रेन आणि रशियातील लोक बंदूक आणि धडाडणाऱ्या तोफांच्या आवाजातही शांतीचा संदेश देत आहे. शशी थरूर यांनी शेअर केलेल्या फोटोत एक युवक युक्रेनचा झेंडा आपल्या अंगावर लपेटून रशियाचा झेंडा अंगावर पांघलेल्या युवतीला प्रेमाने जवळ घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून शशी थरूर यांनी त्याला 'करूणा : युक्रेनचा झेंडा लपेटलेला युवक रशियाच्या झेंड्यातील युवतीला प्रेमाणे आलिंगन देत आहे. प्रेम (Love), शांतता (Peace) आणि सहजीवन (co-existence) युद्ध आणि संघर्षावर मोठा विजय मिळवले असी आशा करूयात.'

युद्धाविरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात कारवाई

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य पाठवल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी युद्धाविरोधात निदर्शने केली. त्यानंतर रशियन पोलिसांनी १७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे, असं वृत्त एफपीने दिलं आहे.

दरम्यान, युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी या युद्धाला विरोध करणारी प्रदर्शने सुरू झाली आहेत. अमेरिकेतही व्हाईट हाऊस समोर युद्धविरोधी प्रदर्शने सुरू झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT