Shayan Ali Ghar Wapsi eSakal
ग्लोबल

Shayan Ali Ghar Wapsi : ISI च्या भीतीमुळे स्वीकारला हिंदू धर्म! पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरने केली 'घरवापसी'ची घोषणा

आज माझ्या पूर्वजांना माझा अभिमान वाटेल असं शायन म्हणाला आहे.

Sudesh

प्रसिद्ध पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल शायन अली सध्या चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, त्याने हिंदू धर्म स्वीकारून आपली 'घर वापसी' झाल्याची घोषणा केली आहे. सध्या तो अमेरिकेत राहतो. त्याने ट्विट करून आपल्या धर्मांतराची माहिती दिली आहे.

जन्माने पाकिस्तानी, मनाने भारतीय

शायन अली (Shayan Ali) आपण जन्माने पाकिस्तानी, मात्र मनाने भारतीय असल्याचे सांगतो. अमेरिका आपली आवड असल्याचंही तो म्हणतो. पाकिस्तानी यंत्रणांच्या त्रासाला कंटाळून २०१९ मध्ये त्याने हा देश सोडला होता. तेव्हापासून तो अमेरिकेत स्थायिक आहे.

कृष्णाने दिला हात

शायनने घरवापसीबद्दलच्या आपल्या ट्विटर पोस्टमध्ये हिंदू धर्म स्वीकारण्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणतो, "२०१९ मध्ये पाकिस्तान सोडल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी सर्व आशा सोडून दिल्या होत्या, मात्र श्रीकृष्णाने मला हात दिला. दोन वर्षं माझ्या पूर्वजांची लाईफस्टाईल आणि संस्कृती जवळून पाहिल्यानंतर, आज मी अधिकृतपणे माझी घरवापसी (Shayan Ali Ghar Wapsi) जाहीर करतोय. आज माझ्या पूर्वजांना माझा अभिमान वाटेल." या ट्विटमध्ये त्याने ISKON चेही आभार मानले आहेत.

सनातन धर्माची शिकवण

एक सनातनी म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छितो, की मी इतर कोणत्याही धर्माविरोधात द्वेष पसरवणार नाही. मी तुमच्या श्रद्धांचा आदर करतो, आणि तुम्ही माझ्या श्रद्धेचा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. कारण गीतेमधून मला प्रत्येक व्यक्तीचा आदर करण्याची शिकवण मिळाली आहे, मग तो कोणत्याही धर्माची असो.

ISI ची भीती, पण पाठीशी कृष्णा

दुसऱ्या एका ट्विटमध्ये शायन अलीने म्हटलं आहे, की "ISI मला मारण्याचा किंवा मला पकडून पाकिस्तानला नेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना माहिती नाही की माझी रक्षा कोण करतंय." या पोस्टसोबत त्याने श्रीकृष्णाचा फोटो शेअर केला आहे.

लवकरच येणार भारतात

"मी लवकरच भारतात येणार आहे. माझे आजी-आजोबा आणि सर्व पूर्वज ज्याठिकाणी जन्माला आले, त्या मातीला आणि तिथल्या लोकांना भेट देण्यासाठी मी येईल" असंही शायनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तान सरकार आणि आयएसआय यावर शायन आतापर्यंत सातत्याने टीका करत आला आहे. त्याने या संस्थेची पोलखोल करणारे ट्विट्सही केले आहेत. पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आदिल राजा यांच्या अटकेनंतर शाययने ISI आता विदेशातही आपला प्रभाव वाढवत असल्याचं ट्विट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT