Shivjayanti celebration in Netherland sakal
ग्लोबल

Netherland Shivjayanti : नेदरलँड मध्ये पार पडला 'शिव-स्वराज्य' विचारांचा जागर

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात... या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

नेदरलँड - शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात... या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते. युरोपातील नेदर्लंड्स येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, नेदर्लंड्स आणि सत्यशोधक, नेदर्लंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती, मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिव - स्वराज्य विचारांचा जागर झाला.

नेदर्लंड्स येथील शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ऑनलाईन उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना, महाराष्ट्र गीत गायनाने झाली. बेल्जियमचे प्रदीप बनसोड यांनी 'पुरोगामी महाराष्ट्र' या विषयावर अतिशय सखोलपणे मांडणी केली. यामध्ये त्यांनी हडप्पा, मोहेंजदरो पासून भारतीय कसे सुधारणावादी होते, हे सर्वाना पटवून दिले.

कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी शिवचरित्र व संबंधित विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जे लोक शिवाजी महाराज व महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन जीवन जगतात, ते अतिशय समृद्ध असं जीवन जगत असतात. शिवचरित्र जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल.

महापुरुषांच्या नावाखाली बरेच लोक विविध अंधश्रद्धा पसरवत असतात, त्यापासून सर्वांनी दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केले. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम समुद्र उल्लंघन करून बसनूर वर स्वारी केली व भारताच्या आरमार दलाचा पाया रोवला, असे प्रतिपादन त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा युरोप दौरा केला व युरोपातील विविध देशांचा त्यांनी अभ्यास केल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच इटालीमध्ये छत्रपती राजाराम यांचं स्मारक असून त्या स्मारकाला आपण भेट द्यावी असं आवाहन केलं. पुढे त्यांनी शिवाजी महाराज आणि डच संबंदावर विशेष प्रकाश टाकला. पन्हाळ्याच्या पायथ्याला बलिदान देणारे शिवाजी काशीद यांची माहिती इतिहासातील डच कागद पत्रांमुळे प्रकाशात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना इंद्रजित सावंत सरांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाल शिवप्रेमींनी 'मी मराठी' या गाण्यावर नृत्य अविष्कार सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर इतर बाल शिवप्रेमींनी 'अनिवासी भारतीय आणि त्यांचे भारताच्या विकासामध्ये योगदान', 'नेदरलँड मधील जीवन पद्धती' याबद्दल महत्वाची माहिती सादर केली. या शिवजयंतीमध्ये बाल शिवप्रेमींचा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सहभाग उल्लेखनीय होता ज्यामध्ये गायन, शिवरायांचा इतिहास, शिव गर्जना इत्यादींचा समावेश होता.

त्यानंतर रामेश्वर कोहकडे यांनी 'शिवचरित्र आणि शिवचरित्रातून आपण काय शिकावे' या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोचळे यांनी केले. कार्यक्रमस्थळी शिवरायांच्या गडकिल्यांची तसेच विविध इतिहासातील प्रसंगांची भित्तीपत्रके लावण्यात आली होती.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन भोसले, संतोष सावंत, पंकज थूल, रेश्मा कोचळे, मनीषा भोसले , प्रदीप लबदे, ज्ञानेश्वर घायाळ व रामेश्वर कोहकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच दुबईहुन राजेश पाटील, विक्रम भोसले, आशिष जिवणे व इतरांचे विशेष सहकार्य मिळाले.

नेदर्लंड्स येथे १ ल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी - युरोपमधील बेल्जियम, जर्मनी या देशांतून आणि नेदर्लंड्सच्या विविध प्रांतातून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT