eyes 
ग्लोबल

मोबाईलमध्ये पाहणं भोवलं; आय ड्रॉपऐवजी डोळ्यात घातला नेल ग्लू

मोबाईलवर वेब सीरिज पाहणं महिलेला पडलं महागात; गमावले असते डोळे

शर्वरी जोशी

मोबाईलचं mobile व्यसन फार वाईट असं कायमच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी म्हणत असतात. काही अर्थी हे खरंदेखील आहे. एका महिलेला मोबाईलमध्ये पाहणं चांगलंच भोवलं आहे. या महिलेने मोबाईलमध्ये पाहण्याच्या नादात डोळ्यात आय ड्रॉपऐवजी चक्क नेल ग्लू nail glue टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(shocking-news-from-uk-woman-accidentally-puts-nail-glue-in-eye)

युकेमध्ये राहणाऱ्या Katie Beith या ३५ वर्षीय महिलेने नजरचुकीमुळे डोळ्यात नेल ग्लू टाकला. सुदैवाने Katie यांचा डोळा बचावला आहे. परंतु, योग्य वेळी उपचार झाले नसते तर त्यांना डोळा गमवावा लागला असता.

Katie Beith यांना ताप आला होता. त्यांमुळे त्या घरातच आराम करत होत्या. यावेळी मोबाईलवर वेब सीरिज पाहत असताना त्यांच्या डोळ्याची जळजळ होऊ लागली. कदाचित ताप आल्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असेल असा विचार करुन त्या डोळ्यात आय ड्रॉप घालू लागल्या. मात्र, त्यांनी आय ड्रॉप समजून चक्क नेल ग्लूच डोळ्यात टाकला.

"मला ताप आला होता आणि त्याच वेळी डोळ्यांची जळजळ होत होती. ही जळजळ थांबवण्यासाठी मी डोळ्यात आय ड्रॉप घालण्याचं ठरवलं. त्यासाठी मी बॅगमध्ये आय ड्रॉप शोधण्याचा प्रयत्न केला. पण, आय ड्रॉप काही सापडले नाही. त्याचवेळी मला बाजूला एक सेम दिसणारी बाटली दिसली. ही बाटली आय ड्रॉपचीच आहे असं समजून मी ते डोळ्यात घातलं आणि त्यानंतर डोळ्यांची जळजळ अधिकच वाढली. डोळ्यांची इतकी आग का होते हे पाहण्यासाठी बाटलीचं निरीक्षण केलं तर ती बाटली नेल ग्लूची असल्याचं लक्षात आलं आणि मी प्रचंड घाबरले. पण लगेच मी स्वयंपाक घरात गेले आणि डोळ्यावर थंड पाणी मारलं", असं Katie ने सांगितलं.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर Katie ने शेजाऱ्यांच्या मदतीने हॉस्पिटल गाठलं आणि उपचार सुरु झाले. सुदैवाने Katie यांचे डोळे बचावले आहे. मात्र, १७ वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रकार मी कधीच पाहिला नाही असं Katie वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT