kim yo un
kim yo un 
ग्लोबल

किम जोंगच्या बहिणीने अमेरिकेला तिखट शब्दांत सुनावलं

कार्तिक पुजारी

अमेरिका आणि उत्तर कोरियामधील संबंध जैसे थे परिस्थितीत आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगने अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अमेरिका आणि उत्तर कोरियामधील संबंध जैसे थे परिस्थितीत आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगने अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. किम यो जोंगने स्पष्ट केलंय की अमेरिकेने त्यांच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा ठेवू नये, यामुळे अमेरिकेला आणखी निराश व्हावं लागू शकतं. किम यो जोंग याचं हे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या टिप्पणीनंतर आलं आहे. (sister of north korean leader kim jong un said usa have wrong expectation)

किम जोंग उन यांनी आपल्या अधिकाऱ्यांना म्हटलं होतं की, चर्चा आणि संघर्ष दोन्हीसाठी तयार रहा. यावर जेक सुलिवन म्हणाले होते की, किम जोंग उन यांचे वक्तव्य चांगले संकेत आहे. उत्तर कोरिया चर्चेच्या पर्यांयांचा शोध येत असल्यास त्यांचे स्वागत असेल. असे असले तरी किम यो जोंग यांनी या चर्चांच्या शक्यतांना फेटाळून लावलं आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमानुसार किम यो जोंग यांनी म्हटलं की, अमेरिका परिस्थितीची व्याख्या स्वत:ला दिलासा देण्यासाठी करत आहे. अमेरिकेने चुकीच्या पद्धतीने उत्तर कोरियाकडून अपेक्षा ठेवली आहे. अमेरिकेच्या पदरी निराशा पडू शकते.

उत्तर कोरियाचे वरिष्ठ अमेरिकी राजदूत सुंग किम दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. अशावेळी किम जोंग उन यांच्या बहिणीने कोणत्याही प्रकारच्या राजनैतिक संबंधांना फेटाळून लावले आहे. सियोल दौऱ्यावर असणाऱ्या सुंग किम यांनी सांगितलं की, अमेरिका उत्तर कोरियासोबत कुठेही, कधीही आणि कोणत्याही अटीशिवाय चर्चा करण्यासाठी तयार होता.

उत्तर कोरिया सध्या अन्न-धान्य कमतरतेच्या समस्येशी झगडत आहे. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांनी अन्न-धान्याच्या कमतरतेचा इशारा दिला होता. खाण्या-पिण्याच्या वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर कोरियाने याआधी भूकबळीचा सामना केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामध्ये अन्न-धान्याची समस्या गंभीर बनली आहे. यावर लवकरच लक्ष न दिल्यास सप्टेंबर २०२१ मध्ये देशाला भूकबळीचा सामना करावा लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे," तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवालांचा सनसणीत आरोप

Cryptocurrency: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी भारतात येण्याच्या तयारीत; रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार?

Viral Video: OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? व्हिडिओ होतोय व्हायरल

25 years of Sarfarosh : आमिर खानला 25 वर्षानंतरही होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप; दिग्दर्शकाने केली पोलखोल

Latest Marathi News Live Update: राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT