Google
ग्लोबल

पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरातील सहा बड्या कार उत्पादन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे

सकाळ डिजिटल टीम

Global Warming : कार्बन उत्सर्जन कमी (Carbon Emmission) करण्यासाठी जगभरातील सहा बड्या कार उत्पादन कंपन्यांनी (Car Companies) पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या कार्यकाळात पेट्रोल - डिझेल (Diesel Petrol Vehicles) वरती चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यामध्ये भारतीय टाटा समुहाच्या (Tata Group) मालकीची असणारी जॅग्‍वार लँड रोव्‍हर (Jaguar Land Rover) कंपनीनेही सहभाग घेतला आहे.

या सहा कंपन्या होत आहेत सहाभागी

रायटर्स च्या वृत्तानुसार, स्वीडन मधील वॉल्वो (Volvo), अमेरिकेतील फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors), डायमलर एजीची मर्सिडीज बेंज (Mercedes Benz), चीनमधील बीवायडी (BYD) व टाटा मोटर्स (Tata Motors) ची जॅग्‍वार लँड रोव्‍हर (Jaguar Land Rover) या कंपन्या एक करारावरती सही करणार आहेत. त्यानुसार, ग्लोबल वार्मिंग ला नियंत्रणात ठेवण्यासाठी 2040 पर्यंत पेट्रोल - डिझेल वरती चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन या कंपन्या पुर्णरित्या बंद करणार आहेत.

ह्या मोठ्या कंपन्यांनी करार करण्यास दिला नकार

जगातील दोन मोठ्या गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याने मोठा झटका बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) आणि फॉक्सवैगन एजी (Volkswagen AG) या कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाही आहेत.

ह्या मोठ्या कंपन्यांनी करार करण्यास दिला नकार

जगातील दोन मोठ्या गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याने मोठा झटका बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) आणि फॉक्सवैगन एजी (Volkswagen AG) या कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाही आहेत.

अमेरिका, चीननेही दिला नकार

COP 26 Summit मध्ये ब्रिटन म्हणाला की, झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी ह्या सहा कंपन्यांव्यतिरीक्त अन्य चार देशही मोहिमेत भाग घेणार आहेत. त्यात न्यूझीलंड आणि पोलंड सारख्या देशांचा सहभाग आहे. मात्र, अमेरिका, चीन सारख्या मोठ्या कार उत्पादन करणाऱ्या देशांनी यामध्ये भाग घेण्यास साफ नकार दिला आहे.

दरम्यान, जगातील सगळ्यात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी स्टेलांटिस (Stellantis), जपानची होंडा (Honda) व निसान (Nissan), जर्मनीची बीएमडब्ल्यू (BMW), दक्षिण कोरियाची हुंडई (Hyundai) या कंपन्यांनीही झिरो कार्बन उत्सर्जन मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर मोबाइल अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर (Uber) भाग घेऊ शकते, अशी माहिती मिळत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT