coronavirus, semen, coronavirus study, china 
ग्लोबल

युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश

सकाळ डिजिटल टीम

बर्लिन: कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक फटका सहन केल्यानंतर युरोपातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. इटली आणि फ्रान्समध्ये लॉकडाउन हटवण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. फुटबॉलच्या चाहत्यांना आता मोठ्या लीगची उत्सुकता लागली असून त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच असताना  इटली- फ्रान्स ही राष्ट्रे मोठ्या संकटातून सावरत आहेत. युरोपातील एका राष्ट्राने तर कोरोनातून मुक्त झाल्याची घोषणा करत आपल्या देशाच्या सीमाही खुल्या केल्या आहेत.  

शुक्रवारी युरोपातील स्लोवानिया या देशाने आपल्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करुन लॉकडाउन हटविणारा स्लोवानिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. स्लोवानियाचे पंतप्रधान जनेझ जानसा  (Janez Jansa) म्हणाले की, 'यूरोपातील सद्य स्थितीकडे पाहिले तर स्लोवेनिया देश अधिक सुरक्षित आहे. गेल्या १४ दिवसांची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता स्लोवेनिया कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.' स्लोवेनिया देशातील ही बातमी संपूर्ण जगाला दिलासा देणारी अशीच आहे.

उत्तर पूर्व युरोप, लातविया, लिथुआनिया आणि एस्टोनिया यांनी लॉकडाउन हटवण्यासंदर्भात आपली वेगळी भूमिका घेत तीन देशांमधील व्यवहार पूर्वपदावर आणण्याबाबत निर्णय घेतला.  इटलीच्या समुद्र किनाऱ्यावरील नजारा आता पर्यटकांसाठी पुन्हा खुणावण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. युरोपात उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटन स्थळे पुन्हा पटरीवर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आयर्लंडमध्ये देखील लॉकडाउन हटवण्याबाबत विचार सुरु आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना 14 दिवस क्वारंटाईन करुन परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची योजना आखण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार,  16 मे सकाळी 10  वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4,396,392 इतका होता. यातील 300,441 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा जीवघेणा विषाणू जगभरात वेगाने पसरला. कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या संक्रमाणामुळे जगाची गती मंदावली आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक लस विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूचा नायनाट करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक देशांनी जीवघेण्या कोरोनाच्या विरोधातील लसीची शोध मोहिम सुरु केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT