ग्लोबल

भारताच्या गुप्ता बंधूंची संपत्ती दक्षिण आफ्रिकानं केली सील

नामदेव कुंभार

भारतामधील गुप्ता बंधूंना दक्षिण आफ्रिकेत झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिका कोर्टानं गुप्ता बंधू आणि त्यांच्या जोडीदारांची संपत्ती सील केली आहे. दक्षिण आफ्रिका सरकार उत्तर प्रदेशच्या गुप्ता बंधूंना शोधत आहे. यांच्यावर दक्षिण आफ्रिकामध्ये भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणावर इंटरपोलची मदतही मागितली आहे. इंटरपोललाकडून लवकरच गुप्ता बंधूंच्याविरोधात रेड जारी करण्यात येईल.

दक्षिण अफ्रीकाच्या राष्ट्रीय अभियोजन प्राधिकरण (NPA) मार्फथ गुप्ता बंधूंचा तपास सुरु आहे. NPA ने इंटरपोलला गुप्ता बंधूंच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढण्याची विनंती करत आहे. त्यामुळे इंटरपोल गुप्ता कुटुंबियाच्या विरोधा विनंती करत ‘रेड नोटिस’ जारी करु शकते. उत्तर प्रदेशमधील अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता, त्यांच्या पत्नी चेताली आणि आरती यांचा शोध दक्षिण आफ्रिका गुप्तचर संघटना करत आहेत. तसेच गुप्ता कुटुंबीयांचा सहकारी इकबाल मीर शर्मा याचीही संपत्ती सील करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे व्यापारी गुप्ता यांच्या परिवारासोबत जोडलेला इकबाल मीर शर्मा याला मागील काही दिवसांपुर्वी अटक करण्यात आली होती. शर्मानं दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा भ्रष्ट्राचाराचा आरोप आहे.

कोण आहेत गुप्ता बंधू?

अजय, अतुल आणि राजेश असे तीन बंधू आहेत. या तिघांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये झाला. तिघांचं शिक्षण येथेच झालं. तिघांनीही सुरुवातीला वडिलांच्या व्यवसायत हातभार लावला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकामध्ये स्थायिक झाले. दक्षिण आफ्रिकाचे माजी राष्ट्रपती जॅकब जुमा यांचे आणि गुप्ता कुटुंबियांचे जवळील संबधं होते. जुमा सरकारमध्ये गुप्ता बंधूंनी मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप आहे. यामुळे जुमा यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Crop Insurance: पीक विम्याची मुदतवाढ मिळाली, पण संकेतस्थळच डाऊन; पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर विमा संरक्षणाचे संकट

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

SCROLL FOR NEXT