ग्लोबल

Live मिटींगमध्ये घडला धक्कादायक प्रकार

या मिटींगमध्ये २३ मोठे नेते सहभागी झाले होते.

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून जगात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामध्येच जगभरतील अनेक कंपन्या किंवा अन्य क्षेत्रातील मिटींग्स, बैठकादेखील झूमद्वारे होत आहेत. विशेष म्हणजे या ऑनलाइन मिटिंगदरम्यान अनेक भन्नाट किस्से घडत असल्याचं आपल्या ऐकिवात आहे. अशाच एका प्रकाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. द. आफ्रिकेच्या (South African) एका मंत्र्याची लाईव्ह मिटींग सुरु असतांना त्यांची पत्नी चक्क नग्न अवस्थेत समोर आल्यामुळे एकच गोंधाळ उडाला आहे. (South African leader Xolile Ndevu wife seen naked during live zoom meeting).

काही दिवसांपूर्वी द. आफ्रिकेच्या संसदीय समितीच्या सदस्यांची एक मिटींग आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये Xolile Ndevu हे कोरोनावर नियंत्रण व त्यावरील उपाययोजना यावर माहिती देत होते. मात्र, ही मिटींग सुरु असतांना त्यांची पत्नी आंघोळ करुन अचानक त्यांच्या मिटींग रुममध्ये आली. विशेष म्हणजे त्या नग्नावस्थेत असल्यामुळे ही मिटींगमध्येच स्थगित करावी लागली.

आयोजित करण्यात आलेल्या झूम मिटींगमध्ये द. आफ्रिकेतील एकूण २३ मोठे नेते सहभागी झाले होते. ही मिटींग सुरु असतांना Xolile Ndevu च्या पत्नी बाथरुममधून नग्नावस्थेत बाहेर आल्या ज्यामुळे संसदीय समितीच्या प्रमुखांनी हस्तक्षेप करत ही बैठक स्थगित केली.

"तुमच्या मागे असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारचे कपडे परिधान केलेले नाहीत. आम्हाला सगळ्यांना कॅमेरात सारं काही दिसत आहे. तुम्ही मिटींगमध्ये असल्याची कल्पना त्यांना दिली नव्हती का?आम्हाला जे दिसतंय तो अत्यंत विचित्र प्रकार आहे. हा काही पहिला प्रसंग नाही. यापूर्वीदेखील तुमच्याशी संवाद साधतांना असे प्रकार घडले आहेत. तुम्ही लाईव्ह टीव्हीवर आहात", असं समितीच्या प्रमुख म्हणाल्या.

दरम्यान, झालेल्या प्रकाराविषयी Xolile Ndevu यांनी जाहीरपणे माफी मागतिली. तसंच या घटनेविषयी प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्टीकरणही दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT