Mask 
ग्लोबल

अमेरिकेत तयार होतोय विशेष मास्क

पीटीआय

न्यूयॉर्क - कोरोना विषाणूची टेस्ट किट, त्याची अचूकता ही डोकेदुखी ठरली असतानाच हार्वर्ड आणि एमआयटीच्या संशोधकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना विषाणूचा सिग्नल देत प्रकाशमान होणारा मास्क तयार करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. झिका, इबोला अशा विषाणूंना हेरणारे सेन्सर बनविण्यासाठी त्यांनी गेली सहा वर्षे खर्च केली आहेत. आताचे संशोधन अत्यंत प्राथमिक अवस्थेत असले तरी त्याची दिशा आश्वासक आहे.

नव्या कोरोना विषाणूचा उगम होण्याआधीपासूनच महामारी हा संशोधक जीम कॉलीन्स यांच्यासाठी प्राधान्याचा विषय होता. एमआयटीमधील (मॅसॅच्युसेट््स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) त्यांच्या जैवअभियांत्रिकी प्रयोगशाळेत सहा वर्षांपूर्वीच इबोला विषाणूचे शोधक उपकरण (सेन्सर) विकसित करण्यास सुरवात झाली होती. एमआयटीसह हारवर्डच्या शास्त्रज्ञांचे छोटे पथक तेव्हा सक्रिय होते. दोन वर्षांत त्यांनी आपला शोधनिबंध प्रकाशित केला. तेव्हा वाढता प्रादुर्भाव झालेल्या झिका विषाणूचा धोका हाताळू शकणारे विशिष्ट तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले होते. आता याच ठिकाणी कोरनाच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु आहे.

काय होत आहे संशोधन?

  • २०१८ पर्यंत प्रयोगशाळेतील सार्स, गोवर, इन्फ्लूएन्झा, हिपॅटायटीस सी, वेस्ट नाईल व इतर विषाणू हेरणारे सेन्सर्स विकसित
  • आता फ्लुरोसेंट फेस मास्कच्या निर्मितीचा प्रयत्न
  • कोरोना झालेल्या व्यक्तीचा श्वास, खोकला किंवा शिंक याचा इशारा मिळणार
  • घशातील द्रव किंवा लाळेत विषाणू असल्यास फेस मास्क प्रकाशमान होऊन सिग्नल देणार  
  • हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास शरीराचे तापमान मोजण्यासारख्या तपासणी पद्धतींमधील त्रुटी दूर होणार
  • रुग्ण आहे त्याच ठिकाणी निदान शक्य
  • गेल्या काही आठवड्यांत सेन्सर्स विषाणू हेरतात का याची चाचणी सुरु
  • चाचणीसाठी थोड्या लाळेचा वापर
  • दुकानात मिळणाऱ्या कोणत्याही मास्कला लावण्याची सोय करण्याचा पर्यायही विचाराधीन
  • येत्या काही आठवड्यांता संकल्पनेला अंतिम रुप देत प्रात्यक्षिकाची अपेक्षा


फ्ल्यूरीमीटरचीही गरज
- मास्कचा सिग्नल साध्या डोळ्यांना दिसत नाही
- प्रकाशमानाची मोजणी करण्यासाठी उपकरणाची गरज
- फ्ल्यूरीमीटर संबोधले जाणारे उपकरण प्रयोगशाळेबाहेर ठेवता येते
- सार्वजनिक ठिकाणी अधिकारी हातात घेऊन ते वापरू शकतात
- सुमारे एक डॉलर किंमत असलेले उपकरण मास्कचे स्कॅनिंग करू शकते
- विषाणू असल्यास सेन्सरचा पिवळा प्रकाश जांभळ्या रंगात रुपांतरीत होणार
- प्रयोगशाळांतील सेन्सर्स रुग्णांची तपासणी दोन ते तीन तासांत करू शकतात

खर्च व वेळेत बचत
- कोरोना चाचणीच्या अहवालासाठी सध्या सुमारे २४ तासांचा वेळ
- रुग्णाला अहवाल मिळेपर्यंत काही दिवस लागू शकतात
- रोगनियंत्रक व प्रतिबंध केंद्राच्या चाचणीचा खर्च ३६ डॉलरच्या घरात
- व्यावसायिक प्रयोगशाळांत हा आकडा ५१ डॉलर
- दोन्ही गोष्टींचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा

प्रवासी वाहतुक सुरु झाल्यानंतर विमानतळावर सुरक्षा तपासणी, विमानात बसताना असे फेस मास्क वापरले जातील अशी कल्पना तुम्ही करु शकता. तुम्ही-मी कामावर येता-जाता ते वापरु शकतो. रुग्णालयांमध्ये येणाऱ्या, तपासणीपूर्वी कक्षात थांबलेल्या रुग्णांसाठीही ते उपयुक्त ठरतील.
- जीम कॉलीन्स 

आधी मांडणी, मग चाचणी
- संशोधनाची आता कागदावर मांडणी
- त्यानंतर प्लॅस्टीक, खनिज स्फटिक (क्वार्टझ) तसेच कागदावरही चाचणी
- या चाचण्या यशस्वी
- सेन्सरमध्ये विषाणू हेरणाऱ्या डीएनए, आरएनए अशा आनुवांशिक वस्तूंचा वापर
- या वस्तू एका कापडात गोठवून व कोरड्या करून यंत्राच्या मदतीने बांधल्या जातात
- आनुवांशिक वस्तू नष्ट न करता त्यामधील ओलावा शोषून घेण्याची यंत्राची क्षमता
- खोलीतील तापमानात अऩेक महिने स्थिर राहण्याची कापडाची क्षमता
- परिणामी मास्क जास्त काळ टिकण्यास वाव

सेन्सर चालण्यासाठी महत्त्वाचे
- ओलावा : शरीरात श्वसनाशी संबंधित श्लेष्मा किंवा लाळ अशा पदार्थांमुळे याची निश्चीती
-  आनुवांशिक क्रम हेरणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT