Sprite Coca Cola Company esakal
ग्लोबल

आता Sprite ची बाटली हिरव्या रंगाची नाही, तर पांढऱ्या रंगाची असणार!

स्प्राईटच्या हिरव्या बॉटलचा रंग आता बदलला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्प्राईटच्या हिरव्या बॉटलचा रंग आता बदलला जाणार आहे.

नवी दिल्ली : स्प्राईट (Sprite) हे उन्हाळ्यात सर्वाधिक सेवन केलं जाणारं शीतपेय आहे. मात्र, स्प्राईटच्या हिरव्या बॉटलचा रंग आता बदलला जाणार आहे. आता हिरव्या रंगाची स्प्राईट बाटली पांढरी होणार आहे. कंपनीनं (Coca Cola Company) 60 वर्षांनंतर हिरव्या रंगाची बाटली पांढऱ्या रंगात बदलण्याचा निर्णय घेतलाय.

स्प्राईटची हिरव्या रंगाची बाटली 1 ऑगस्टपासून दिसणार नाहीय. कंपनीनं त्याचा नवा लूकही जारी केलाय. स्प्राईटची निर्माती कोका-कोलानं 60 वर्षांनंतर लोकप्रिय कोल्ड्रिंकच्या जागी पांढरी किंवा पारदर्शक बाटली आणण्याचा निर्णय घेतलाय. पांढऱ्या रंगाची बाटली अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

स्प्राईटची मूळ कंपनी कोका-कोलानं सांगितलं की, 1 ऑगस्ट 2022 पासून याबाबतचा नियम लागू होणार आहे. बाटलीचं पॅकेजिंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आमच्या पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. आता आम्ही पांढऱ्या रंगाच्या बाटलीचं रिसायकल करून पुन्हा नवीन बाटली बनवू शकतो. त्यामुळं आम्ही हिरवी बाटली बंद करण्याचा निर्णय घेतलाय, असं कंपनीनं स्पष्ट केलंय. दरम्यान, सर्वप्रथम आम्ही नवीन पांढऱ्या रंगाची बाटली उत्तर अमेरिकेत लाँच करू. त्यानंतर ती हळूहळू भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दिसू लागेल. दरवर्षी बाटल्या तयार करण्यासाठी सुमारे 3 दशलक्ष टन प्लास्टिकचा वापर केला जातो. 2021 सालासाठी कोका-कोलाचा महसूल $ 38.66 अब्ज म्हणजेच, 3 लाख कोटी रुपये होता, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT