Sri Lanka Sakal
ग्लोबल

श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, आता शेअर बाजारात 'नो ट्रेडिंग'

नुकतेच श्रीलंकन सरकारने हार्ड डिफॉल्ट टाळण्यासाठी आगामी काही काळ इतर देशांचे कर्ज फेडू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : दिवाळखोरी आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात (Crises In Sri Lanka) सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. नुकतेच श्रीलंकन सरकारने हार्ड डिफॉल्ट टाळण्यासाठी आगामी काही काळ इतर देशांचे कर्ज फेडू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता कोलंबो स्टॉक एक्सचेंज, श्रीलंकेचे मुख्य स्टॉक एक्सचेंजमध्ये 18 एप्रिलपासून पाच दिवस व्यापार होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या सिक्युरिटी कमिशनने कोलंबो स्टॉक एक्सचेंजला हा आदेश दिला आहे. देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना ही वेळ देण्यात आली असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (No Trading In Colombo Stock Exchange)

'ब्लूमबर्ग' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने शनिवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "स्टॉक एक्स्चेंजच्या संचालक मंडळाने आणि इतर भागधारकांनी बाजार तात्पुरता बंद करण्यास सांगितले आहे." SEC ने त्यांनी सांगितलेल्या कारणांचा काळजीपूर्वक विचार केला आहे आणि देशातील सद्य परिस्थितीचा शेअर बाजारावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन केले आहे. त्यानंतर एक्सचेंजने हा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतही राजकीय संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. 81 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या या देशावर यावर्षी 8.6 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. मात्र, सरकारने अलीकडेच सर्व विदेशी कर्जाची भरपाई काही काळासाठी स्थगित केली आहे. अत्यावश्यक वस्तू आणि इंधनाच्या आयातीसाठी परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून अंत्यसंस्कार

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT