Gotabaya Rajapaksa News | Sri Lanka Crisis 
ग्लोबल

SriLanka Crisis : राजपक्षेंबाबतचं 'ते' वृत्त निराधार; भारताची स्पष्टोक्ती

राजपक्षे हे बुधवारी श्रीलंकेतून बाहेर पडत मालदीव इथं आश्रयाला गेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंकेतील अनागोंदीच्या परिस्थितीमुळं राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यांना पळून जाण्यात भारतानं मदत केल्याच्या बातम्या श्रीलंकेतील काही माध्यमांनी दिल्या होत्या. याची गंभीर दखल घेत भारतानं राजपक्षेंना अशी कोणतीही मदत केली नसल्याचं भारतीय उच्चायुक्तांनी स्पष्ट करण्यात आलं आहे. (Sri Lanka Crisis Rajapaksa not helped to flee Clear rom High Commission of India in Colombo)

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तानं याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या श्रीलंकेबाहेर जाण्यासाठी भारताने सोय केल्याचे बिनबुडाचे आरोप आणि चुकीच्या बातम्या भारतीय उच्चायुक्त स्पष्टपणे नाकारत आहे. श्रीलंकन जनतेला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार आम्ही करत आहोत. लोकशाही मार्ग आणि मूल्ये, प्रस्थापित लोकशाही संस्था आणि घटनात्मक चौकट याद्वारे श्रीलंकेचे नागरिक सध्या त्यांच्या समृद्धी आणि प्रगतीच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही उच्चायुक्तांनी म्हटलं आहे.

श्रीलंकेत सध्या परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, अॅम्ब्युलन्स चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल शिल्लक राहिलेलं नाही. अॅम्ब्युलन्स सेवेनं नागरिकांना फोन न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सेवा देण्यास असमर्थ आहोत. लोकांना एकावेळचं अन्नही व्यवस्थित मिळेनासं झालं आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. डाळीच्या किंमतीत तीनपट वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, भूकबळी आणि कुपोषणाची समस्या निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT