Sri Lanka Curfew esakal
ग्लोबल

श्रीलंकेत पंतप्रधानांच्या मुलासह 26 मंत्र्यांचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेत कर्फ्यू असूनही सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली आहेत.

श्रीलंकेच्या मंत्रिमंडळानं (Sri Lanka Cabinet) रविवारी उशिरा झालेल्या बैठकीत एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. याबाबतची माहिती खुद्द शिक्षणमंत्र्यांनी दिलीय. श्रीलंकेत कर्फ्यू (Sri Lanka Curfew) असूनही सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली आहेत. शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने यांनी पत्रकारांना सांगितलं की, राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) आणि त्यांचे मोठे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. ते म्हणाले, सर्व मंत्र्यांनी राजीनामे सादर केले, जेणेकरून राष्ट्रपती नवीन मंत्रिमंडळाची स्थापना करू शकतील. देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र, दिनेश गुणवर्धने यांनी सामूहिक राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलेलं नाहीय. राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं की, परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळं उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा परिणाम देशावर झाल्याय, त्यामुळं सरकारविरोधात नागरिक आक्रमक झालेत. कर्फ्यू असूनही सायंकाळी मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. आंदोलक राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा विशेष अधिसूचना जारी करून श्रीलंकेत 1 एप्रिलपासून तात्काळ लागू होणारी आणीबाणी जाहीर केली. सरकारनं शनिवारी सायंकाळी 6 ते सोमवारी (4 एप्रिल) सकाळी 6 वाजेपर्यंत 36 तासांचा कर्फ्यू लागू केला.

सोशल मीडियावरील बंदी उठवली

दरम्यान, श्रीलंका सरकारनं रविवारी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली. देशात सरकारविरोधी निदर्शनं होण्यापूर्वी देशव्यापी सार्वजनिक आणीबाणी आणि 36 तासांचा कर्फ्यू जाहीर करण्याबरोबरच सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवण्याबाबत एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, व्हायबर, टेलिग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या सेवा 15 तासांनंतर पूर्ववत करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Update: मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या वाढणार, सत्तासमीकरण बदलणार?

Chhatrapati Sambhajinagar: पुस्तकांचा खजिना झाला खुला; शंभरहून अधिक दालने, नामांकित प्रकाशकांचा सहभाग!

Sakal Book Festival: पुस्तकांच्या पालखीतून ‘वाचनसंस्कृतीचा जयघोष’; ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन परिसरातून ग्रंथदिंडी!

BSF Success Story: शेतकरी आई-वडिलांच्या कष्टांचे चीज; मुलाची सीमा सुरक्षा दलात निवड, डोळ्यातून आनंदाश्रू, मित्रांनी उधळला गुलाल!

लहान सावित्री ठरतेय प्रेक्षकांची लाडकी, तक्षा शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक

SCROLL FOR NEXT