sri lanka financial crisis Mahinda Rajapaksa in Parliament first time since his resignation sakal
ग्लोबल

महिंदा राजपक्ष संसदेत हजर

राजीनाम्यानंतर प्रथमच आगमन: तूर्त मुक्काम नौदल तळावरच

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : श्रीलंकेवर आर्थिक संकट कायम असून आज महिंदा राजपक्ष राजीनाम्यानंतर प्रथमच संसदेत हजर राहिले. त्यांचा मुक्काम सध्या त्रिंकोमाली येथील नौदलाच्या तळावर आहे. परिस्थिती निवळेपर्यंत त्यांना त्रिंकोमालीतच ठेवण्यात येणार असून त्यांच्या जिवाचे संरक्षण करणे सरकारची देशाची जबाबदारी असल्याचे संरक्षण सचिवाने म्हटले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईला आणण्यास राजपक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत नागरिकांनी त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन सुरू ठेवले आहे.

या आंदोलनाचा भडका गेल्या आठवड्यात उडाला. श्रीलंकेचे तीनदा पंतप्रधान राहिलेले महिंदा राजपक्ष (वय ७६) यांनी गेल्या आठवड्यात आपले निवासस्थान जळताना पाहिले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने ‘टेंपल ट्री’ सोडून त्रिंकोमालीतील नौदलाच्या तळावर आश्रय घेतला. ते भारतात पळून गेल्याचीही अफवा पसरली होती. परंतु सरकारच्या वतीने या बातमीचे खंडन करण्यात आले.

महिंदा राजपक्ष यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विरोधकांवर हल्ले केले तर दुसरीकडे संतप्त जनतेने सरकार समर्थक नेत्यांवर हल्ले सुरू केले. यावेळी झालेल्या हिंसाचारात किमान २०० जण जखमी झाले तर ९ जणांचा मृत्यू झाला.

महिंदांचा मुलगाही संसदेत

महिंदा राजपक्ष यांच्यासमवेत त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री नमल राजपक्ष अधिवेशनात हजर राहिले. निवेदनात म्हटले, की दोघे राजपक्ष मंगळवारी गैरहजर होते. काल अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव आणला होता. संरक्षण सचिव जनरल (सेवानिवृत्त) कमल गुणरत्ने म्हणाले, की महिंदा राजपक्ष हे नेहमीसाठी त्रिंकोमाली येथे राहणार नाहीत. पण स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्यांच्या आवडीच्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येईल.

जागतिक बँकेकडून १८ कोटी डॉलर

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेला जागतिक बँकेकडून १८ कोटी डॉलरचे अर्थसाह्य मिळाल्याचे संसदेत सांगितले. आर्थिक संकटामुळे देशात इंधन आणि गॅसची टंचाई आहे. त्यामुळे जागतिक बँकेकडून मिळालेल्या पैशाचा उपयोग हा काहीप्रमाणात इंधन खरेदीसाठी होऊ शकतो का, याचा विचार केला जात आहे, असे ते म्हणाले. आशियायी विकास बँकेकडून देखील अनुदानाची शक्यता आहे. जागतिक बँकेच्या पैशाचा उपयोग इंधनासाठी करता येणार नाही. परंतु यातील काही पैसे वापरता येईल का, याचा विचार केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT