Chin-and-America 
ग्लोबल

चीनच्या भीतीने अजिबात दबून जाणार नाही; अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर

यूएनआय

बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील सरावाच्या बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातील शब्दयुद्धही कायम आहे. आपल्याकडे विमानवाहू युद्धनौकांना भेदणारी वैविध्यपूर्ण अस्त्रे आहेत आणि दक्षिण चिनी समुद्र पूर्णपणे चिनी लष्कराच्या पकडीखाली आहे, असा इशारा चीनने दिला. त्यावर, ‘आम्ही भीतीने दबून जाणार नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राने दिले. त्यानुसार चीनकडे ‘डीएफ-२१डी’ आणि ‘डीएफ-२६’ अशी विमानवाहू युद्धनौकांना उद्‌ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हा समुद्र पूर्णपणे ताब्यात असल्यामुळे अमेरिकी युद्धनौकांना कोणतीही हालचाल केली तर चिनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आनंदच होईल, अशी आक्रमक भाषा चीनने वापरली आहे. तशा वृत्ताचे ‘ट्‌वीट’ही करण्यात आले. 

त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या संपर्क प्रमुखांनी ट्विट केले. या सागरी क्षेत्रात लष्करी सरावासाठी पाठविलेल्या ‘युएसएस निमित्झ’ आणि ‘युएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांचा उल्लेख करण्यात आला. ‘ग्लोबल टाइम्समधील वृत्त ‘टॅग’ करून ‘आमच्या मर्जीनुसार असा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. त्यात म्हटले आहे की, (सागरी क्षेत्र तुमच्या पकडीखाली असूनही) आमच्या विमानवाहू युद्धनौका तेथे आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमच्या दोन युद्धनौका सक्रिय आहेत, ज्या कुणामुळेही दबून जाणाऱ्या नाहीत.

लष्करी सरावाची पार्श्‍वभूमी 
चीनने पॅरासेल बेटांजवळ लष्करी सराव सुरु ठेवला आहे. त्यास प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकी युद्धनौकांवरील सैनिकांनीही सराव केला. चिनच्या सरावावर अमेरिकेसह इतर काही देशांनी टीका केली आहे. पॅरासेल बेटांवर चिन, फिलीपीन्स, व्हिएतनाम असे देश दावा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT