Apple  
ग्लोबल

न्यूड फोटो FBवर लीक, iPhone ला मोजावे लागतायेत कोट्यवधी रुपये

नामदेव कुंभार

दुरुस्तीसाठी सर्विस सेंटरमध्ये दिलेल्या मोबाईलमधील न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यामुळे आयफोन कंपनीला कोट्यवधींची रक्कम मोजावी लागत आहे. अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे ही घटना घडली. एका विद्यार्थिनींने आपला आयफोन तांत्रिक दुरुस्तीसाठी अ‌ॅपल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला दिला होता. आयफोन दुरुस्त करणाऱ्या टेक्निशिअनने त्यातील गोपनीय फोटो आणि व्हिडीओ फोसबुकवर पोस्ट केले. मित्र आणि नातेवाईकांचे फोन आल्यानंतर त्या मुलीच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिनं अॅपल कंपनीला कोर्टात खेचलं होतं. या प्रकरणाचा निकाल मुलीच्या बाजूनं लागला असून नुकसानभरपाई म्हणून कोट्यवधी रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

2016 मध्ये ही मुलीच्या आयफोनमधील फोटो लीक झाल्याचा प्रकार घडला होता. त्या मुलीनं पाच वर्ष लढा दिला अखेर निकाल तिच्या बाजूनं लागला आहे. आयफोनच्या सर्विस सेंटरमधील टेक्निशिअनने गोपनीयतेचं उल्लंघन केलं. त्यानं दहा नग्न फोटो आणि एक व्हिडीओ तिच्याच फेसबुक खात्यावरून पोस्ट केले. तसेच हे फोटो आणि व्हिडिओ तिने स्वत: शेअर केल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र मित्र आणि नातेवाईकांनी याबाबत सांगितल्यावर तिने तात्काळ फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यानंतर तिने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला.

अॅपल कंपनीने या प्रकरणाची दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. 2016 पासून सुरु असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला असून यावर तोडगा म्हणून कंपनीला अब्रुनुकसानीसाठी भरपाई देण्यास सांगितली आहे. तोडग्यासाठी दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या वकीलाने या खटल्यासाठी पाच मिलियन डॉलर्सची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT