sudan air strike on omdurman kills at least 22 people sudan army rsf conflict  
ग्लोबल

Sudan Air Strike : सुदानमध्ये लष्कर अन् आरएसएफ संघर्ष पेटला! हवाई हल्ल्यात २२ ठार

रोहित कणसे

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात सुरू असलेल्या लढाईत सुदानमधील ओमडुरमन शहरावर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान २२ लोक ठार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आठवडाभर चाललेल्या संघर्षात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.

आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राजधानी खार्तूम जवळच्या ओमडुरमन शहराच्या निवासी भागात हा हल्ला झाला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ला हा राजधानी आणि इतर शहरांमध्ये लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यातील आता पर्यंतचा सर्वात भूषण हल्ला आहे. तसेच गेल्या महिन्यात खार्तूममध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात पाच मुलांसह १७ जण ठार झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, आरएसएफने लष्करावर ओमडुरमनच्या निवासी भागात हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या भागात प्रतिस्पर्धी गटांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हल्ल्यात ३१ जण ठार झाल्याचे आरएसएफने एका निवेदनात म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार, लष्कराने एक महत्त्वाचा सप्लाय कनेक्शन तोडण्याचा प्रयत्नात हा केला.

दरम्यान आरएसएफने सुदानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या गटाने त्यां्या निवेदनात लष्कराने (SAF)कडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात ३१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक नागरिक देखील जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT